Fitness Tips : चाळीशीनंतरही वाटाल विशीतले, फक्त या गोष्टी फॉलो करा; वाचा चिरतरूण राहण्याचं रहस्य

चाळीशीनंतरही तरूण दिसावं आणि उतारवयातही टवटवीत दिसावं, असं प्रत्येकाला वाटतं आणि ते शक्यही आहे. त्यासाठी गरज आहे पोषक आहार आणि नियमित व्यायामाची. वाचा चिरतरूण राहण्यासाठीच्या काही कॉमन टिप्स.

Fitness Tips
चाळीशीनंतरही चिरतरूण राहण्यासाठी टिप्स  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चाळीशीनंतरही राहा फिट अँड फाईन
  • रोज पोषक आहार आणि भरपूर व्यायाम करण्याची गरज
  • मुबलक पाणी पिल्याने त्वचा होईल चमकदार

Fitness Tips | चाळीशी हा वयाचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. तारुण्याचं सर्वोच्च शिखऱ असं चाळीशीचं वर्णन करण्यात येतं. तारुण्याला अंतिम टोकावर चाळीशी पोहोचवते. मात्र या टोकानंतरचा प्रवास मात्र प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. काहीजण या टोकावरून वेगाने वार्ध्यक्याकडे फेकले जातात, तर काहीजण त्याच टोकावर पुढील अनेक वर्षे मुक्काम ठोकतात. त्यांचं चाळीशीतलं तारूण्य हे कित्येक वर्षे टिकून राहतं आणि त्यामुळे जणू काही वय लॉक झाल्यासारखं इतरांना वाटत राहतं. ही कमाल होते ती आरोग्याशी संबंधित काही बाबींची योग्य ती काळजी घेतल्यामुळे आणि नित्यनेमाने काही नियम पाळल्यामुळेच. 

चाळीशीनंतर सुरू होतात तक्रारी

चाळीशीनंतर अनेकांना आरोग्यासंबंधी तक्रारी सुरू होतात. गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी यासारखे किरकोळ विकार डोकं वर काढू लागतात. काहीजणांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तर काहीजणांचा रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाऊ लागतो. काहीजणांना सांधे आणि हाडं दुखायला सुरुवात होते. या सगळ्या समस्यांना दूर ठेवायचं असेल तर आरोग्यपूर्ण आहार आणि योग्य प्रकारचा व्यायाम नियमित करणं गरजेचं असतं. योग्य आहार आणि व्याायाम यांच्या मदतीनं अनेक विकारांना आपण दूर ठेऊ शकतो.

अधिक वाचा - Addiction of Cold Drink : ना दारु, ना सिगरेट! या पठ्ठ्याला जडलं कोल्ड्रिंकचं व्यसन; वर्षभरात खर्च व्हायचे 7 लाख रुपये

आरोग्यपूर्ण आहार

सतत फिट राहण्यासाठी आरोग्यपूर्ण आहार घेणं गरजेचं असतं. आहारात योग्य प्रमाणात प्रोटिन, व्हिटॅमिन, फायबर यासह पोषक घटक असतील, याची खातरजमा करणं गरजेचं आहे. शरीरात कुठल्याच घटकाची कमतरता भासू नये आणि सर्व प्रकारचं पोषण मिळत राहिल, याची काळजी घेणं गरजेचं आहे. 

मुबलक पाणी

अनेकदा वय वाढतं, तशा चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला सुरुवात होते. यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. दररोज मुबलक पाणी पिल्यामुळे शरीराचा वार्ध्यक्याकडचा प्रवास हळूहळू होतो आणि चिरकाल व्यक्ती तरूण दिसत राहते. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. आहारात पाण्याचं प्रमाण जरी योग्य राखलं तरी काही दिवसांतच त्वचा चमकदार दिसायला सुरुवात होते. 

अधिक वाचा - Strong Bones: तिशीनंतर सुरू होतात हाडांच्या तक्रारी...हाडे मजबूत करण्यासाठी हे खा!

व्यायाम आहे अत्यावश्यक

फिट राहण्यासाठी उत्तम आहारासोबत उत्तम व्यायामदेखील गरजेचा आहे. त्यासाठी दररोज न चुकता व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामामुळे शरीर सक्रीय राहतं आणि शरीरातील सर्व अवयव योग्य रितीने आपापलं काम करत राहतात. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांचा एकमेकांशी उत्तम ताळमेळ राहतो आणि कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते. नियमित व्यायम करण्यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे वाढत्या वयातही तारुण्याचा अनुभव घेता येतो. 

अधिक वाचा - Dehydration: शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर दिसतात ही लक्षणे, दिसल्याबरोबर व्हा सावध

पोषण बिया आणि ड्रायफ्रूट्स

शरीराचं पोषण करण्यात भोपळ्याच्या बिया, खजूर आणि ड्रायफ्रूट्स यासारखे घटक मदत करतात. वाढत्या वयासोबत पोषक आहाराकडेही आपण दुर्लक्ष करू लागतो. याचा परिणाम शरीरावर होऊ लागतो. त्यामुळे आपल्या आहारात नियमितपणे अक्रोड, बदाम, ड्रायफ्रूट्स, भोपळ्याच्या बिया यासारख्या पोषणमूल्य असणाऱ्या घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी