Acne Treatment health tips in marathi : चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा मुरुम ही त्वचेशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. या समस्येने जगभरातील लाखो लोक त्रस्त असतात. सौम्य मुरुम ते सिस्टिक मुरुम असे विविध प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. यापासून सुटका मिळावण्यासाठी अनेक प्रकारचे उपचार केले जातात. बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम किंवा औषधांचा वापर करण्यात येतो. तर काहीजण थंड पाण्याने अंघोळ केल्याने मुरुमांपासून सुटका मिळते असे मानतात. पण खरोखर असे आहे का? जाणून घेऊयात..
तेल आणि मृत त्वचेमुळे केसांच्या कूपांमध्ये मुरुम येतात. त्वचेवरील छिद्रांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात ज्यमुळे जळजळ, लालसरपणा होतो. हार्मोन्स आणि इतर घटकांमुळे मुरुम होऊ शकतात. तसेच तेलकट उत्पादनांच्या अतिवापरामुळे सुद्धा ही समस्या उद्भवू शकते.
हे पण वाचा : काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय
एका थेअरीनुसार, थंड पाणी हे त्वचेतील तेलाचे उत्पादन कमी करण्यास मदत करते. जेव्हा थंड पाण्याच्या संपर्कात त्वचा येते तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे तेल हे ग्रंथींमध्ये रक्तप्रवाह तात्पुरता कमी करु शकतात. यामधून ग्रंथींद्वारे तयार होणारे तेलाचे प्रमाण कमी करू शकते.
हे पण वाचा : अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा होईल घोटाळा
थंड पाणी त्वचेवरील घाण काढून टाकते आणि त्वचेवरील छिद्र साफ करते. कोमट पाणी हे छिद्र उघडून परिस्थिती आणखी बिघडवू शकते. ज्यामुळे घाण आणि तेल तेथे अडकते. तर थंड पाणी हे त्वचेवरील छिद्रांना संकुचित करते आणि घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
हे पण वाचा : गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची योग्य पद्धत माहितीये का?
अनेक व्यक्तींचा अनुभव आहे की, थंड पाणी मुरुमांपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरते. पण हे सिद्ध करण्यासाठी कोणताही वैज्ञानिक संशोधन नाहीये. पण काही अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोल्ड थेरेपी, जसे की क्रायोथेरेपीचा त्वचेवर अँटी-इंफ्लेमेटरी प्रभाव पडतो ज्यामुळे पिंपल्ची समस्या कमी होते.