crack heels : थंडीत फक्त चेहराच नाही तर संपूर्ण शरीर कोरडे पडत असते. हिवाळ्यात (winter)टाचांना भेगा पडल्याने लोकही खूप त्रासलेले असतात. काही लोकांच्या घोट्यातून रक्तस्त्राव सुरू होतो. ज्यामध्ये खूप वेदनाही सुरू होतात. हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये (atmosphere) ओलावा कमी असल्यामुळे हा त्रास वाढू लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करावेत, जे तुमची ही समस्या मुळापासून दूर करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या टिप्सबद्दल. (Do cracked heels bleed in winter? Then do this home remedy)
अधिक वाचा : दीपिका-रणवीर की केमिस्ट्री चाहत्यांना लागला करंट
तुम्हाला तुमच्या टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर स्क्रबिंग करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही साखर, मध आणि लिंबू वापरा.यामुळे तुमच्या टाचांमधील मृत पेशी निघून जातील.तडे गेलेल्या टाचांपासून मुक्त होण्यासाठी मेण देखील खूप प्रभावी आहे.यात दोन थेंब तेल मिसळून ते आपल्या टाचांना लावावे. त्यानंतर मोजे घालावेत. सकाळी ते स्वच्छ करा. यामुळे तुमची फाटलेली टाच हळूहळू बरी होण्यास सुरुवात होईल.
अधिक वाचा : लग्नसमारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट, 60 जण होरपळले
तांदळाचे पीठ तुम्हांला भेगा पडलेल्या टाचांपासून आराम देण्यासाठी देखील प्रभावी आहे. तुम्हाला 2 चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे, त्यानंतर त्यावर 1 चमचा मध, 3-4 थेंब सफरचंदाचे व्हिनेगर आणि ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल टाकून मसाज करावे. भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठीही व्हॅसलीन प्रभावी आहे. तुम्हाला फक्त ते झोपण्यापूर्वी लावायचे आहे. यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळू लागेल. याशिवाय टाचांना भेगा पडण्यापासून सुटका मिळवायची असेल तर गरम पाण्यात पाय ठेवून बसा, त्यानंतर टाचांना प्युमिस स्टोनने घासून घ्या, त्यानंतर बदाम तेल किंवा खोबरेल तेल गरम करून टाचांवर लावा.
टाचांना भेगा या पायांचं सौंदर्य खराब करतात. शिवाय त्या जर जास्त प्रमाणात पडल्या असतील किंवा त्या फाटल्या असतील तर त्या दुखतातही. चालण्यासही त्रास होतो. टाचांना भेगा का पडतात हा प्रश्न पडतो? टाचांना भेगा पडण्याचं कारण म्हणजे आपला चुकीचा आहार. आहारातून शरीरास इ जीवनसत्त्वं, कॅल्शिअम आणि लोह गेलं नाही तर त्याची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून टाचांना भेगा पडतात किंवा टाचा फाटतात.