Cold Watermelon Side Effects । मुंबई : आता जूनचा महिना उजाडला तरीदेखील भारतातील बहुतेक भागात तीव्र उष्णता आहे, अनेक शहरांमध्ये दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. कडाक्याच्या उन्हात आणि घामाच्या स्थितीत शरीरात गारवा राहण्यासाठी लोक ताजी आणि थंडगार फळे खातात. कलिंगड हे त्यातीलच एक आहे, कारण कलिंगडामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते. (Do not accidentally eat watermelon stored in the fridge in this way).
जेव्हा आपण बाजारातून कलिंगड विकत घेऊन घरी आणतो तेव्हा त्याचा आकार खूप मोठा असतो आणि ते एकाच वेळी खाणे कठीण असते, त्यामुळे कलिंगड जास्त काळ ताजे राहावे म्हणून आपण ते फ्रिजमध्ये ठेवत असतो. लक्षणीय बाब म्हणजे कापलेले अर्धे कलिंगड फ्रिजमध्ये ठेवणे अत्यंत हानिकारक ठरू शकते.
अधिक वाचा : मान्सून कर्नाटकात दाखल तर महाराष्ट्रात येणार कधी?
कलिंगड फ्रीजमध्ये ठेवल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लाइकोपीन आणि सिट्रोलिन या महत्त्वाच्या पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. तसेच ते कापून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचे इन्फेक्शन होऊ शकते, ज्यामुळे नंतर अन्न विषबाधा (Food Poisoning) होऊ शकते. त्यामुळे कलिंगड ताजे असतानाच खाणे केव्हाही चांगले.
खरं तर कलिंगडाला फ्रिजमध्ये ठेवण्याची गरजही नाही कारण त्याची साल मजबूत आणि जाड असते, त्यामुळे हे फळ लवकर खराब होत नाही. जर तुम्हाला टरबूज फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर ते कापण्याच्या अगोदर ठेवा आणि तुम्ही असे न कापलेले कलिंगड २० दिवस फ्रिजमध्ये ठेवू शकता.
डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.