Food Combination: फणस खाल्ल्यानंतर या गोष्टींचे चुकूनही करू नका सेवन; आरोग्याचे होईल मोठे नुकसान

तब्येत पाणी
Updated Jun 04, 2022 | 14:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Food Combination । फणसाची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. फायबर, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम आणि कॅल्शियमने समृद्ध असलेल्या फणसाचे सेवन केल्याने शरीराला भरपूर पोषकतत्वे मिळतात.

 Do not consume these things by mistake after eating jackfruit 
फणस खाल्ल्यानंतर या गोष्टींचे चुकूनही करू नका सेवन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फणसाची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • फायबर, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम आणि कॅल्शियमने समृद्ध असलेल्या फणसाचे सेवन केल्याने शरीराला भरपूर पोषकतत्वे मिळतात.
  • फणस खाल्ल्यानंतर दूध पिणे हानिकारक ठरू शकते.

Food Combination । मुंबई : फणसाची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. फायबर, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम आणि कॅल्शियमने समृद्ध असलेल्या फणसाचे सेवन केल्याने शरीराला भरपूर पोषकतत्वे मिळतात. पण मासांहारासारखा दिसणारा फणस खाण्यासाठी काही लोक टाळाटाळ करतात. त्याचबरोबर जे लोक फणस खाण्याचे शौकीन असतात, त्यांना त्यापासून बनवलेले लोणचेही आवडते. मात्र फणस शरीरासाठी जेवढा चांगला आहे तेवढाच घातक देखील आहे, कारण फणस खाल्ल्यानंतर काही गोष्टींचे सेवन केल्यास त्यामुळे त्रास होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया फणस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये.

अधिक वाचा : रोहित आणि विराटसाठी आगामी टी-२० वर्ल्डकप शेवटचा असू शकतो

फणस खाल्ल्यानंतर या गोष्टींचे करू नका सेवन
 

  1. दूध पिऊ नये - फणस खाल्ल्यानंतर दूध पिणे हानिकारक ठरू शकते. यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. आरोग्य तज्ञ सांगतात की, फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्यास पांढरे डाग, मुरुम आणि खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय पचनाच्या समस्याही जाणवू शकतात. 
  2. मधाचे सेवन करू नये - फणस खाल्ल्यानंतर लगेच मधाचे सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते. खर तर यामुळे साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकते, जी डायबिटीजच्या रुग्णांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. त्यामुळे चुकूनही फणस खाल्ल्यानंतर लगेच मध खाऊ नये.
  3. पपईचे सेवन घातक - फणस खाल्ल्यानंतर लगेच पपईचे सेवन केले तर त्याचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आरोग्य तज्ञांच्या मते, फणस खाल्ल्यानंतर लगेच पपई खाल्ल्याने शरीरात जळजळ होऊ शकते, जी आरोग्यासाठी गंभीर समस्या बनू शकते.
  4. पान खाणे टाळा - काही लोकांना जेवण झाल्यावर लगेच पान खाण्याची सवय असते. अशा स्थितीत जर फणसानंतरही पान खाल्ले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फणसानंतर पान खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर लगेच पान खाणे टाळले पाहिजे. 

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी