Health Tips During Pregnancy: गरोदरपणात घरातली 'ही' 7 कामं करणं अवश्य टाळा, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Aug 09, 2022 | 16:03 IST

Avoid This Work During Pregnancy: महिलांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागते. कारण असं केलं नाही तर तुमच्या आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Health Tips During Pregnancy
हेल्थ टीप्स 
थोडं पण कामाचं
  • गरोदरपणाचा काळ (Pregnancy period) महिलांसाठी (women) खूप अविस्मरणीय असतो. या काळात महिला अनेक गोष्टींचा अनुभव घेत असतात.
  • स्वत:ला व्यस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी काही ना काही काम करत राहणं आवश्यक आहे.
  • तुम्ही जशी तुमच्या आहाराची आणि आरोग्याची (Diet and Health) काळजी घेता, तशीच तुम्हाला जीवनशैलीत आवश्यक बदल करण्याचीही गरज असते.

नवी दिल्ली: Household Works To Avoid During Pregnancy: गरोदरपणाचा काळ  (Pregnancy period) महिलांसाठी (women)  खूप अविस्मरणीय असतो. या काळात महिला अनेक गोष्टींचा अनुभव घेत असतात. या काळात महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. महिलांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागते. कारण असं केलं नाही तर तुमच्या आणि न जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.  मात्र, याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही दिवसभर हातावर हात ठेवून बसूनच राहावं. असं केल्यानं कंटाळा येतो किंवा स्वत:ला आजारी असल्यासारखं वाटू लागतं. स्वत:ला व्यस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी काही ना काही काम करत राहणं आवश्यक आहे. तुम्ही जशी तुमच्या आहाराची आणि आरोग्याची (Diet and Health) काळजी घेता, तशीच तुम्हाला जीवनशैलीत आवश्यक बदल करण्याचीही गरज असते. 

गर्भधारणेदरम्यान काळजी घेणं का महत्त्वाचं?

गरोदरपणात तुमचे वजन वाढते. विशेषत: हे वजन तुमच्या पोटाभोवती जास्त असते, ज्यामुळे तुम्हाला काही वेळा चालण्यात आणि शरीराचा समतोल राखण्यात अडचण येते. गरोदरपणात घरकाम करण्यावर बंदी नाही, पण तुम्ही काही कामे आवश्यक टाळली पाहिजेत.

अधिक वाचा- शमिता शेट्टी-राकेश बापट यांचं Patch Up?, पापाराझीला ही दिली पोझ

या गोष्टींपासून विशेषकरून दूर ठेवा

जड वस्तू उचलू नका

गरोदरपणात, विशेषतः पहिल्या तीन महिन्यांत कोणत्याही प्रकारच्या जड वस्तू उचलणे टाळावे. असे काहीतरी उचलणे किंवा ढकलल्याने पाठीला दुखापत किंवा ताण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच गरोदरपणात तुमच्या शरीरात हार्मोनल बदल होतात, त्यामुळे तुमचे सांधे हलके मोकळे होतात. ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.

जास्त वेळ उभे राहू नका 

तुम्ही विशेषतः अशी सर्व कामे करणे टाळावे, ज्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ उभे राहावं लागेल. विशेषत: जेव्हा तुम्हाला खूप थकवा आणि मळमळ होण्याची समस्या उद्भवत असते. जास्त वेळ उभे राहिल्याने तुमच्या पायांना सूज आणि वेदना होऊ शकतात. म्हणून प्रयत्न करा की तुम्ही जेवण बनवत असताना किंवा काही काम करत असताना, मध्ये मध्ये थोडा वेळ ब्रेक घेऊन बसा आणि विश्रांती घ्या.

जास्त वाकू नका 

गरोदरपणात खूप वाकणे आणि पुसणं, कपडे धुणे, झाडू यासारखी कामं टाळावीत. कारण वजन वाढल्यामुळे तुमच्या शरीराचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत खूप वाकल्यास आपल्या sciatic नसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही काही काम करत असाल ज्यामध्ये वाकणं आवश्यक असेल तर ते काळजीपूर्वक करा आणि तुम्हाला अस्वस्थ वाटल्यास तर लगेच थांबवा.

टेबलवर चढणं टाळा

गर्भधारणेदरम्यान स्टूल किंवा शिडीवर चढणं खूप धोकादायक असते. कारण तुमच्या शरीराचे वजन सामान्य दिवसांपेक्षा जास्त असते. ज्यामुळे संतुलन राखण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. हे करताना थोडीशी चूक झाली तर तुमच्या बाळाला नुकसान होऊ शकते. परिणामी तुमची प्रीमेच्योर प्रसूती किंवा प्रीटर्म प्रसूती होण्याची शक्यता असते.

जास्त केमिकलचा वापर करू नये 

कोणत्याही प्रकारची हार्श केमिकल्स बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. कीटकनाशकांमध्ये वापरले जाणारे पाइपरोनिल बुटॉक्साइड हे रसायन गर्भधारणेदरम्यान बाळाच्या मेंदूच्या विकासास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे या काळात केमिकल असलेल्या अशा प्रोडक्ट्सचा वापर कमी करणं आवश्यक आहे. आपण केमिकल फ्री प्रोडक्ट्सचा वापर करू शकता. 

पंखे साफ करू नका

पंखा साफ करण्यासाठी तुम्हाला कदाचित उंच शिडी चढण्याची गरज असते. म्हणून, अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्या शरीरावर जास्त ताण, असंतुलन आणि वेदना निर्माण होणार नाहीत. 

अधिक वाचा-  ​रक्षाबंधनासाठी बनवा सोपे आणि चविष्ट शेंगदाण्याचे लाडू

मांजरीची विष्ठा किंवा कचरा साफ करणे

मांजरीच्या विष्ठेमध्ये टॉक्सोप्लाझ्मा गोंडी नावाचा परजीवी असतो, जो मल साफ करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम करू शकतो. आता जर तुमच्या इथे मांजरी असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत हातमोजे, मास्क आणि आवश्यक असल्यास कोट घालूनच मल स्वच्छ करा. त्यानंतर नक्कीच आपले हात चांगले धुवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी