Dinner Diet: रात्री Dinner ला चुकूनही खाऊ नका 'या' पाच गोष्टी बिघडू शकते तब्येत

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Aug 14, 2022 | 15:15 IST

Diet Tips: अनेक वेळा दिवसभरातील बिघडलेल्या जीवनशैलीमुळे रात्री काहीही खाल्ले जात. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. कारण रात्रीचे जेवण (Dinner) आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

Diet Tips
डाएट टीप्स 
थोडं पण कामाचं
  • सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये खाणं पिणं खूप महत्त्वाचं आहे. या काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार खूप गरजेचा आहे.
  • अनेक वेळा दिवसभरातील बिघडलेल्या जीवनशैलीमुळे रात्री काहीही खाल्ले जात. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
  • जर तुम्हीही संध्याकाळनंतर या 5 पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवले (Habit) असेल तर आजपासूनच ही सवय सोडून द्या.

नवी दिल्ली: Dinner Food: सध्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये खाणं पिणं खूप महत्त्वाचं आहे. या काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार खूप गरजेचा आहे. अनेक वेळा दिवसभरातील बिघडलेल्या जीवनशैलीमुळे रात्री काहीही खाल्ले जात. असे करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. कारण रात्रीचे जेवण  (Dinner)  आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. रात्री हलके खाल्ल्याने तुमची पचनक्रिया (Digestion) चांगली होते आणि झोपही चांगली लागते, असेही आयुर्वेदातही सांगितलं आहे. जे तुम्हाला दिवसा ताजे आणि उत्साही बनवते. त्यामुळे जर तुम्हीही संध्याकाळनंतर या 5 पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवले (Habit) असेल तर आजपासूनच ही सवय सोडून द्या.

मसालेदार पदार्थ सोडून द्या 

भारतीय जेवण मसाल्याशिवाय पूर्ण होत नाही. पण रात्री मसालेदार पदार्थ किंवा चटपटीत खात असाल तर ते आजपासूनच सोडा. कारण या खाद्यपदार्थात वापरण्यात येणारे तेल आणि तूप अतिशय घातक ठरू शकते. हे खाल्ल्याने तुमच्या छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. भविष्यात हृदयाशी संबंधित आजारही तुम्हाला होऊ शकतात.त्यामुळे रात्री मसालेदार पदार्थ टाळावेत.

अधिक वाचा- गेल्या चार-पाच वर्षांपासून राजू श्रीवास्तव 'Heart Patient', डॉक्टरांनी केला खुलासा

चिकन-मटण-बिर्याणी टाळा 

जर तुम्ही रात्रीच्या वेळी चिकन-मटण बिर्याणी खाण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या कारण ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. अशा अन्नामध्ये कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण जास्त असते. फक्त मटण बिर्याणीबद्दल बोलायचे झाले तर एका छोट्या सर्व्हिंगमध्ये 500-700 कॅलरीज असतात. ते पचनासाठी अधिक वेळ घेते आणि त्यामुळे तुमची दिनचर्याही बिघडण्याची शक्यता असते. 

भजी वाढवेल डोकेदुखी

संध्याकाळी 7 वाजल्यानंतर भजी खाण्याचा मोह होत असेल तर ते बिल्कूल टाळा. ते तुमच्या पोटासाठी अजिबात चांगलं नाही. भजी बराच वेळ तेलात तळले जातात. हे ऍसिड पदार्थासारखे कार्य करते. रात्री ते खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. यामुळे तुमच्या झोपेत देखील व्यत्यय आणू शकते जे अनेक आजारांचे मूळ कारण आहे.

मिठाईपासून राहा दूर

मिठाई खायला कोणाला आवडत नाही? पण जर ते रात्री खाल्ले तर ते तुमच्या शरीराला खूप हानी पोहोचवू शकतात. रात्री ते खाल्ल्याने अन्न पचण्यास त्रास होतो. तुमच्या झोपण्याच्या पद्धतीतही अडथळा येऊ शकतो. मिठाई देखील संध्याकाळी 7 नंतर खाऊ नये, कारण ते तुमच्या शरीराच्या झोपेच्या पद्धतीमध्ये अडथळा आणू शकतात. रात्रीच्या जेवणानंतर मिठाईचे सेवन केल्याने अन्न पचण्यास त्रास होतो. 

रात्री कॉफी पिणे टाळा

अनेकदा रात्री झोप न आल्याने अनेकजण कॉफी पितात. तुम्हीही असे करत असाल तर तसे करणे टाळा. कारण जेव्हा तुम्ही चहा, कॉफी किंवा ग्रीन टी सारखी कॅफिनयुक्त पेये पितात तेव्हा त्याचा तुमच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे रात्री कॉफी पिणे टाळावं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी