मुंबई : गरोदरपणा (pregnancy) हा असा काळ आहे ज्या काळात स्त्रियांना अनेक वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. शरीरातील हार्मोनल (Hormonal)बदलांमुळे खाण्याबद्दलच्या चित्र विचित्र इच्छा गरोदर स्त्रीला होत असतात. परंतु असे काही पदार्थ आहेत जे आपण खाणं टाळले पाहिजेत. गरोदरपणात कमी शिजवलेले किंवा कच्चे मांस (raw meat) किंवा मासे आणि संसर्गाचा (infection) धोका असणारे इतर पदार्थ टाळली पाहिजेत. (Do not eat these foods and drinks during pregnancy; Which foods can be harmful to your baby)
अधिक वाचा : गरोदरपणात तणाव दूर करण्यासाठी सोप्या टिप्स
गरोदर झाल्यानंतर महिलांनी काय खाऊ नये हे जाणून खूप गरजेचे आहे. पण जर एखादी महिला ही चहा- कॉफी प्रेमी असेल किंवा तिला खाण्या-पिण्याची आवड असेल तर त्यांना गरोदरपणात खाण्यावर बंधने लादणे मोठ्या जिकरीचे काम होत असते. पण वाचक मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का, खाण्याच्या बंधनापेक्षा काय खावे याची लिस्ट मोठी असल्याने तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
अधिक वाचा : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन
काय प्यावे आणि काय खावे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरून कोणताही धोका आई व बाळ दोघांना होणार नाही आणि ते या काळात सुरक्षित राहून अगदी योग्य पद्धतीने डिलिव्हरी होईल. कोणते पदार्थ आहेत जे गरोदर महिलांनी खाणे टाळावेत. कोणते पदार्थ खाऊ नयेत याची यादी आम्ही यात देत आहोत..
मर्क्युरी असलेले मासे खाणे महिलांनी टाळलं पाहिजे. शार्क, मॅकरेल, किंग आणि टिलफिश माशांमध्ये मोठ्या प्रमाणार मर्क्युरी असते. जास्त प्रमाणात मर्क्युरीचे सेवन केल्यास गर्भातील बाळाचा विकास संथ गतीने होऊ शकतो आणि त्याच्या मेंदूच्या वाढीत अडथळा निर्माण होऊ शकतो. या सीफूडमुळे अॅलर्जी, रॅशेस, उलटी आणि अतिसार सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जास्त मर्क्युरी असलेले मासे हे प्रदुषित पाण्यात आढळतात. त्यामुळे स्तनपान करणारी माता किंवा गरोदर स्त्रियांनी याचे सेवन टाळावे.
अधिक वाचा : हे शाकाहारी पदार्थ केसांना बनवतात मजबूत
खाण्यावर बंधनं ठेवणं हे खवय्या गरोदर महिलांसाठी हे जर काठीण काम आहे. पण ते महत्त्वाचे आहे. कच्चा मासे किंवा कमी शिजवलेले मासे खाणे हे गरोदर महिलांसाठी घातक आहे. शेलफिशमुळे अनेक संक्रमण होऊ शकतात. या जिवाणू किंवा परजीवी संसर्ग होऊ शकतात. संसर्गामुळे कमजोरपणा येत असतो.
गरोदर महिलांना मासे खाण्यानेच त्रास होतो असे नाही तर कमी शिजवलेले मटण खाणंदेखील त्रासदायक ठरू शकते. कमी शिजवलेले किंवा कच्चे मांस खाल्ल्याने टॉक्सोप्लाझ्मा, ई. कोलाई, लिस्टेरिया आणि साल्मोनेला यासह अनेक जीवाणू किंवा परजीवीपासून संसर्ग होण्याचा धोका वाढतो. टण व्यवस्थित स्वच्छ न केल्यास त्यात साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया तयार होतात.
अधिक वाचा :लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर
गरोदरपणात मटण खाल्ल्याने गर्भात शिकणारे मूल आणि आई दोघांचेही नुकसान होऊ शकते. संशोधनानुसार, अनेक महिला गरोदरपणात मटण खातात, त्यामुळे त्यांनी मटण अतिशय काळजीपूर्वक खावे. कमी शिजलेले मटण किंवा लाल मांस खाल्ल्याने मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो.
कच्ची अंडीमध्ये साल्मोनेला बॅक्टेरियाने असतात. साल्मोनेला जिवाणूचा संसर्ग झाला तर त्याच्या लक्षणांमध्ये ताप, मळमळ, उलट्या, पोटात पेटके आणि अतिसार यांचा समावेश होतो.
हे विविध प्रकारच्या पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये लोह, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन ए, जस्त, सेलेनियम आणि तांबे यांचा समावेश आहे - हे सर्व तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगले असते. गर्भधारणेदरम्यान जास्त प्रमाणात प्राण्याच्या मार्फत व्हिटॅमिन ए (प्रीफॉर्म्ड व्हिटॅमिन ए) चं सेवन करू नये. प्रीफॉर्म्ड व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात सेवन केल्याने, विशेषत: गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत, जन्मजात विकृत किंवा गर्भपात होऊ शकतो.
अधिक वाचा : लग्नाला उशिर कराल तर बाप बनण्यास होईल अडचण
मोठ्या प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने, ज्यामध्ये कॅफिन असते, गर्भपात होऊ शकतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की गर्भधारणेदरम्यान दररोज 200 मिलीग्राम कॅफिनचे सेवन सुरक्षित आहे. त्यापेक्षा जास्त कॅफिन धोकादायक ठरू शकते
बडीशेप आणि मेथीदाण्याचे सेवन केल्यास गर्भाशयामध्ये आकुंचन निर्माण होऊन मुदतपूर्व प्रसूती कळा सुरु होऊ शकतात किंवा गर्भपात सुद्धा होऊ शकतो. याशिवाय तिळाचे सेवन केल्यास सुद्धा गर्भपाताचा धोका उद्भवू शकतो.
अल्कोहोलचे सेवन टाळा कारण ते गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम करते आणि गर्भपात आणि मृत जन्माचा धोका वाढवते. मद्यपान केल्याने फेटल अल्कोहोल सिंड्रोम म्हणून ओळखले जाणारे सिंड्रोम होऊ शकते, ज्यामुळे चेहर्याचे विकृती आणि बौद्धिक अपंगत्व येऊ शकते.