Bone Health Tips: आपल्या शरीराचे वजन आपल्या हाडांवर अवलंबून असते. म्हणूनच मजबूत हाडे असणे खूप महत्वाचे आहे. जन्मानंतर 20 वर्षांपर्यंत हाडांचा पूर्ण विकास होतो. त्यानंतर हाडांची वाढ खूप मंद होते. परंतु 30 वर्षांनंतर ते पूर्णपणे थांबते. हाडे जितकी मजबूत असतील तितके वृद्धापकाळात हाडांच्या समस्या कमी होतील आणि तुम्ही निरोगी असाल. म्हातारपणात हाडे तंदुरुस्त ठेवण्यासाठी तारुण्यात हानिकारक गोष्टींचे सेवन करणे टाळा. (Do not eat these foods in youth for strong bones)
यामुळेच तारुण्यात चांगला आहार घेणे आवश्यक आहे. वयाच्या 30 वर्षानंतर योग्य आहार न घेतल्यास हाडे कमकुवत होऊ लागतात. तसेच, तुम्हाला ऑस्टियोपोरोसिस, हाडांचा कर्करोग, हाडांचे संसर्ग यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मजबूत हाडे आणि चांगल्या हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम प्रथिने आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. हे सर्व पोषक तत्व आपल्याला चांगल्या आहारातून मिळतात. परंतु अलीकडे चुकीच्या आहारामुळे शरीराला हे पोषक तत्व कमी प्रमाणात मिळत असून हाडांचे आरोग्य बिघडू लागले आहे. कमी वयात हाडे ठिसूळ झाल्याने इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणते पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
अधिक वाचा: Amaxophobia किंवा ड्रायव्हिंगची भीती कशी टाळायची? जाणून घ्या लक्षणे आणि त्यावरील उपाय
एशिया पॅसिफिक जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित 2016 च्या अभ्यासानुसार, चीनमधील ज्या लोकांनी जास्त मीठ खाल्लं त्यांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढला होता. या आजारात हाडे पातळ आणि निर्जीव होतात. तसेच खारट अन्न खाल्ल्याने त्यातील कॅल्शियम कमी होते. ब्रेड रोल, पिझ्झा, सँडविच, सूप, पनीर, पॉपकॉर्न, चिप्स, फरसाण, अंडी आणि ऑम्लेटमध्ये मीठ जास्त असते. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते.
पबमेड सेंट्रल अभ्यासानुसार आहारात जास्त साखरयुक्त पदार्थ असल्यास कॅल्शियम. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मूत्रात उत्सर्जित होते. त्यामुळे कॅल्शियम शोषून घेणे कठीण होते. चॉकलेट, पेस्ट्री, केक, सॉस आणि मिठाई असे प्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत. याचा केवळ हाडांवरच परिणाम होत नाही तर मधुमेह देखील होऊ शकतो.
अधिक वाचा: Mango Side Effects: आंब्यासोबत हे 4 फूड कॉम्बिनेशन ठरू शकते धोकादायक
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या 2014 च्या अभ्यासात सोडा पिणाऱ्या 73,000 महिलांमध्ये हिप फ्रॅक्चरचा धोका वाढल्याचे आढळून आले. सोडासारख्या कार्बोनेटेड पेयांमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. एका अभ्यासानुसार शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढल्याने हाडांची घनता कमी होते किंवा हाडे ठिसूळ होतात.
अल्कोहोलचे सेवन शरीरासाठी नेहमीच हानिकारक असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्थराइट्स अँड मस्कुलोस्केलेटलच्या अभ्यासानुसार, धूम्रपान किंवा मद्यपान केल्याने शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम शोषण्यात अडथळा येतो. अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे आहाराकडे लक्ष दिले जात नाही.
अधिक वाचा: Yoga for Period: पीरियड क्रॅम्प्सपासून आराम मिळवण्यासाठी बेस्ट वॉल योगा पोज
विशेषत: पिझ्झा, पेस्ट्री, केक, सोडा यासारख्या प्रोसेस्ड फूडचा वापर तरुणांमध्ये वाढू लागला आहे. ज्या वयात हाडे मजबूत होतात त्याच वयात चुकीचे खाण्यापिण्याचे सेवन केल्यास त्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील. त्यामुळे हाडांचे आजार लवकर होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच 20 ते 30 वयोगटातील लोकांनी हाडांच्या मजबुतीसाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. यात अर्थातच दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, तूप, पनीर यांचे सेवन करावे. अन्नामध्ये सोयाबीन आणि नाचणीचा समावेश करा, हे देखील हाडांच्या मजबुतीसाठी पौष्टिक पदार्थ आहेत. तसेच, पुरेसा सूर्यप्रकाश आणि व्यायामामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होईल.