Dinner Tips: रात्री 'या' गोष्टी खाल्ल्यास दिवसभर होईल पश्चाताप, आजपासूनच असा घाला आवर

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Oct 26, 2022 | 09:40 IST

Healthy Dinner: रात्री झोपताना रात्रीचे जेवण नेहमी हेल्दी आणि हलके असावे. जेणेकरून अन्नाचे पचन सहज होईल. त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्या झोपताना खाऊ नयेत.

Healthy Dinner
रात्री 'या' गोष्टी खाल्ल्यास दिवसभर होईल पश्चाताप, आजपासूनच करा कंट्रोल 
थोडं पण कामाचं
  • कॅफिनयुक्त अन्न खाल्ल्याने किंवा पेय (Foods or Drinks ) प्यायल्याने रात्री झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते.
  • या प्रकारच्या खाण्यामुळे झोपेची पद्धत देखील प्रभावित होते. त्याचबरोबर काही गोष्टी अशा असतात ज्या तुमची पचनक्रिया बिघडवण्याचे काम करतात.
  • जर तुम्ही रात्री चॉकलेट किंवा कॉफीचे सेवन केले तर त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

मुंबई:  Dinner Tips In Marathi: रात्रीचे जेवण (Dinner)  नेहमी हलके असावे, जेणेकरून ते पचायला सोपे जाते असे डॉक्टरांचे म्हणणे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. यासोबतच रात्रीच्या जेवणात अशा गोष्टींचा समावेश करू नये, ज्यामध्ये कॅफिनचे प्रमाण असते. कॅफिनयुक्त अन्न खाल्ल्याने किंवा पेय (Foods or Drinks )  प्यायल्याने रात्री झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. या प्रकारच्या खाण्यामुळे झोपेची पद्धत देखील प्रभावित होते. त्याचबरोबर काही गोष्टी अशा असतात ज्या तुमची पचनक्रिया बिघडवण्याचे काम करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही रात्री खाणे टाळावे.

चॉकलेट किंवा कॉफीचे सेवन करू नका

जर तुम्ही रात्री चॉकलेट किंवा कॉफीचे सेवन केले तर त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते.  ज्यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवते.

अधिक वाचा-  या वर्षी पुढील सूर्यग्रहण कधी होणार?, वाचा Details मध्ये

टोमॅटोचे सेवन

रात्री झोपण्यापूर्वी टोमॅटोचे सेवन करू नये. टोमॅटो खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतो, ज्यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते.

तेलकट पदार्थ

जर तुम्ही रात्री तेलकट पदार्थांचे सेवन केले तर ते दिवसभर तुम्हाला त्रास देऊ शकतात.  तेलकट गोष्टी सहज पचत नाहीत, कारण त्या पचण्यासाठी जलद पचनशक्ती असणे आवश्यक असते, तर रात्री झोपताना पचनाचा वेग मंदावतो.

कांदा खाणे

रात्रीच्या जेवणात कांदा खाल्ल्यास त्याचा तुमच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. कांद्यामुळे पोटात गॅस निर्माण होतो. ज्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होतो.

फळांचं सेवन

फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असले तरी ते कधीही झोपेच्या वेळी खाऊ नयेत. कारण बहुतांश फळे आम्लयुक्त असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात आम्लीय प्रतिक्रिया निर्माण होते. त्यामुळे आम्लपित्ताची समस्याही होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी