Healthy Tips: ब्रेकफास्टमध्ये चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, आरोग्यावर होतील 'हे' दुष्परिणाम

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Sep 17, 2022 | 14:45 IST

Healthy Tips: आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चहासोबत काही गोष्टी खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर खूप नुकसान होते. या गोष्टींमुळे अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि पोट खराब होऊ शकते. त्यामुळे चहासोबत पाच गोष्टी टाळल्या पाहिजेत.

Healthy Tips
ब्रेकफास्टमध्ये चहासोबत चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी 
थोडं पण कामाचं
  • भारतातील बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपनं (cup of tea) करतात.
  • पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत काही गोष्टी खाल्ल्याने आपल्या आरोग्याला खूप नुकसान होण्याची शक्यता असते.
  • आज आम्ही तुम्हाला चहासोबत कोणत्या गोष्टी खाल्ल्याने शरीरासाठी हानी पोहोचू शकते ते सांगणार आहोत.

नवी दिल्ली: Healthy Tips: भारतातील बहुतेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपनं (cup of tea) करतात. अशा लोकांना चहाशिवाय दिवसाची सुरूवात करणंही कठिण जातं.  लोकांना चहासोबत वेगवेगळ्या गोष्टी खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत काही गोष्टी खाल्ल्याने आपल्या आरोग्याला खूप नुकसान होण्याची शक्यता असते. डॉक्टरांचे म्हणणं आहे की,  भारतातील बहुतेक लोक चहासोबत अशा गोष्टी खातात, ज्यामुळे आपल्या आरोग्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हानी पोहोचते. आज आम्ही तुम्हाला चहासोबत कोणत्या गोष्टी खाल्ल्याने शरीरासाठी हानी पोहोचू शकते ते सांगणार आहोत. 

ड्राय फ्रूट्स 

बरेच लोक त्यांच्या ब्रेकफास्टमध्ये ड्राय फ्रूट्स खातात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. मात्र तुम्हाला माहित आहे का की सकाळी चहासोबत ड्रायफ्रुट्स खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या कॉम्बिनेशन आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

अधिक वाचा- 'या' नॅचरल गोष्टी करतात क्लींजरचे काम, तुम्हीही करून बघा ट्राय

लिंबू

आजकाल वजन कमी करण्यासाठी लोक लिंबू चहाचे सेवन करू लागले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी रिकाम्या पोटी लिंबू चहाचे सेवन केल्याने अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या वाढू शकतात.

भजी

भारतातील बहुतेक लोक पावसाळ्यात चहा-भजीचा आस्वाद घ्यायला विसरत नाहीत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बेसनापासून बनवलेल्या गोष्टी चहासोबत खाल्ल्याने अपचन आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. हे शरीराला इतर गोष्टींमधून पोषकद्रव्ये शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते.

हळद

अन्नाची चव वाढवणाऱ्या हळदीचा वापर त्याच्या फायदेशीर घटकांमुळेही केला जातो. पण चहासोबत याचे सेवन केल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे पोट खराब होणे, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

थंड पदार्थ 

चहासोबत थंड पदार्थ खाऊ नयेत. थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाल्ल्याने आपली पचनक्रिया बिघडते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हे कॉम्बिनेशन तुमचे पोटही खराब करू शकते.

अधिक वाचा-  बडीशेप-आलं खाण्याचे आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

(अस्वीकरण: या लेखात सुचविलेल्या टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक सल्ला म्हणून समजू नये.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी