High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास शरीराचा हा भाग देतो इशारा, चुकूनही करू नका दुर्लक्ष

High Cholesterol in body : बदललेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपण शारीरिक हालचाली किंवा अंगमेहनतीच्या कामे कमी करतो. त्याचबरोबर आपल्या आहारातदेखील अनेक चुकीच्या सवयी आणि पदार्थ यांचा समावेश झाला आहे. त्यातच आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही. त्याशिवाय जर आपण जास्त तेलकट अन्न खाल्ले तर ते आपल्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol)वाढवण्यास कारणीभूत ठरते. कोलेस्टेरॉल वाढत असताना शरीर आपल्याला इशारे देत असते.

High Cholesterol Symptoms
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे 
थोडं पण कामाचं
  • बदललेल्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाली कमी, व्यायामाचा अभाव
  • आपल्या आहारातदेखील अनेक चुकीच्या सवयी आणि पदार्थ यांचा समावेश
  • हे सर्व घटक आपल्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल (Cholesterol)वाढवण्यास कारणीभूत ठरतात

High Cholesterol Warning Sign : नवी दिल्ली : बदललेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपण शारीरिक हालचाली किंवा अंगमेहनतीच्या कामे कमी करतो. त्याचबरोबर आपल्या आहारातदेखील अनेक चुकीच्या सवयी आणि पदार्थ यांचा समावेश झाला आहे. त्यातच धकाधकीच्या जीवनात आणि आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही. याचा विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्याशिवाय जर आपण जास्त तेलकट अन्न खाल्ले तर ते आपल्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल (Cholesterol)वाढवण्यास कारणीभूत ठरते.  वाढलेल्या कोलेस्टेरॉलमुळे उच्च रक्तदाब (High Blood Pressure), मधुमेह (Diabetes), हृदयविकाराचा झटका (Heart Attack), ट्रिपल वेसल डिसीज आणि कोरोनरी आर्टरी डिसीजचा (Coronary Artery Disease) धोका वाढतो. कोलेस्टेरॉल वाढत असताना शरीर आपल्याला इशारे देत असते. त्याकडे आपण लक्ष देणे आवश्यक असते. (Do not ignore these symptoms of high level of Cholesterol in body)

अधिक वाचा : Benefits of Rose Flower : गुलाबाच्या पाकळ्या असतात मूळव्याधवर प्रभावी...शेफ संजीव कपूर यांनी सांगितले 4 आश्चर्यकारक फायदे

वाढलेल्या कोलेस्टेरॉलचे इशारे कसे ओळखावे?

शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण केवळ रक्त तपासणीद्वारेच निश्चित केले जाऊ शकते, परंतु काहीवेळा अशा काही समस्या शरीरात वाढू लागतात ज्यामुळे आपल्याला या धोकादायक स्थितीचा संकेत मिळतो. जेव्हा कोलेस्टेरॉल वाढू लागते, तेव्हा आपल्या पायातील वेदना वाढते आणि हे चेतावणी चिन्ह ओळखणे फार महत्वाचे आहे कारण नंतर ते घातक ठरू शकते.

अधिक वाचा : Hair Care Tips : केसगळती ते कोंडा यासारख्या विविध समस्यांमधून सुटका मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय...

तुमच्या पायांच्या या स्थितीकडे दुर्लक्ष करू नका

  1. - आपल्या सर्वांना माहित आहे की उच्च कोलेस्टेरॉलच्या स्थितीत आपल्या शरीरातील नसा ब्लॉक होऊ लागतात. हीच स्थिती पेशींच्या मज्जातंतूंमध्ये देखील होते. यामुळे शरीराच्या सर्वात खालच्या भागात ऑक्सिजन पोचत नाही आणि त्यामुळे पोटऱ्यांमध्ये तीव्र वेदना होतात.
  2. - जेव्हा शरीरात वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते, तेव्हा त्या व्यक्तीच्या पायात पेटके येऊ लागतात. त्याचबरोबर रात्री झोपताना अनेक वेळा पायात तीव्र वेदना होतात. मात्र थोडावेळ उभे राहिल्यानंतर रक्तप्रवाह बरोबर होतो आणि वेदना दूर करण्यास मदत करते.
  3. - वाढत्या कोलेस्टेरॉलच्या सर्वात धक्कादायक लक्षणांपैकी एक म्हणजे पाय आणि नखे यांचा रंग बदलणे, अनेकदा ते पिवळे होऊ लागतात. पायांना रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नसल्याने असे घडते.
  4. - हिवाळ्यात पायांना थंडी वाजणे ही सर्वसामान्य बाब गोष्ट आहे. मात्र उन्हाळ्यात किंवा सर्वसामान्य तापमानातही पाय अचानक थंड होत असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

अधिक वाचा : Remedies For Itchy Skin : हे घरगुती उपाय पावसाळ्यातील त्वचेच्या समस्यांवर देतील त्वरित आराम...

या सर्व लक्षणांकडे आणि बाबींकडे वेळीच लक्ष दिल्यास पुढील मोठे आजार टाळता येऊ शकतात.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी