थंडीपासून (Winter) बचावासाठी लोक आपली खास काळजी (special care) घेतात. शरीर गरम (heat) ठेवण्यासाठी लोक गरम कपडे (warm clothes) घालतात. यावेळी कान (ear) आणि पाय (legs) गरम ठेवण्यासाठी अनेक लोक मोजे (socks) पायात घालूनच झोपतात. मात्र हे आपल्यासाठी घातक (dangerous) ठरू शकते. मोजे घालून झोपल्याने आपण अनेक गंभीर आजारांच्या (dangerous deceases) तडाख्यात सापडू शकता. जाणून घ्या कोणत्या आजारांचा धोका मोजे घालून झोपल्याने वाढतो.
मोजे घालून झोपल्याने आपले रक्ताभिसरण कमी वेगाने होते जे आपल्यासाठी घातक आहे. घट्ट मोजे घालून झोपल्यानेही असे होऊ शकते. यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रात्री झोपताना चुकूनही मोजे घालू नका.
झोपताना मोजे घालणे किंवा खूप वेळ मोजे घातल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढू शकते. पायांना घाम येऊ शकतो ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. सोबतच नियमित वापरासाठीही सुती मोजे घ्या जे आपल्या पायाला आलेला घाम शोषून घेतील आणि इन्फेक्शन होण्यापासून थांबवतील.
रात्री झोपताना मोजे घातल्याने पायाच्या नसांवर दबाव पडतो ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करताना जास्त जोर लावावा लागतो. यामुळे हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपताना मोजे घालू नयेत.
थंडीच्या दिवसात लोक दिवसभर मोजे घालून सर्वत्र फिरतात, त्यात धूळ आणि माती चिकटते. जर आपले मोजे साफ नसतील आणि कापड चांगले नसेल तर यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आणि दुर्गंध येऊ लागतो. त्यामुळे हे मोजे घालून झोपल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
एका अभ्यासानुसार, जर आपण रात्री मोजे घालून झोपू इच्छित असाल तर आपले मोजे साफ आहेत याची खात्री करा. सोबतच आपले मोजे एकदम सैल असतील आणि सुती कापडाचे असतील याची खात्री करा. चुकूनही झोपताना नायलॉन किंवा इतर कुठल्या जाड कापडाचे मोजे घालून रात्री झोपू नका ज्यातून हवा खेळणार नाही.