Beautiful Skin Tips : सुंदर त्वचेसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा या गोष्टी...

Skin care Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. आपले ओठ तडकायला लागतात. परिणामी चेहऱ्याचे सौंदर्य नाहीसे होऊ लागते. मग आपण बाजारातील अनेक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो. काहीवेळा त्याचा फायदा होत चेहऱ्याचा रंग सुधारतो. मात्र खरोखरच सुंदर त्वचा हवी असेल आणि त्वचेचे आरोग्य (Skin Health) टिकवून ठेवायचे असेल तर तुम्ही काही गोष्टी रोज केल्या पाहिजे.

Beautiful Skin
सुंदर त्वचा 
थोडं पण कामाचं
  • सुंदर त्वचा प्रत्येकालाच हवी असते
  • त्वचेची निगा राखणे महत्त्वाचे
  • चेहऱ्याची रोज मालिश करण्याच्या टिप्स

How to get Beautiful Skin : नवी दिल्ली : सुंदर त्वचा प्रत्येकालाच हवी असते. तजेलदार त्वचेमुळे व्यक्तिमत्त्व खुलून येते. मात्र सुंदर त्वचेसाठी (Beautiful Skin), त्वचा निरोगी असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी त्वचेची काळजी (Skin Care) घ्यावी लागते. हवामान बदलले की सर्वात आधी त्वचेवर परिणाम होतो. खासकरून हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. आपले ओठ तडकायला लागतात. परिणामी चेहऱ्याचे सौंदर्य नाहीसे होऊ लागते. मग आपण बाजारातील अनेक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो. काहीवेळा त्याचा फायदा होत चेहऱ्याचा रंग सुधारतो. मात्र खरोखरच सुंदर त्वचा हवी असेल आणि त्वचेचे आरोग्य (Skin Health) टिकवून ठेवायचे असेल तर तुम्ही काही गोष्टी रोज केल्या पाहिजे. विशेष करून जर हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य टिकवायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी रोज चेहऱ्याला मसाज केले पाहिजे. चेहऱ्याला कशाने मालिश करायची ज्यामुळे त्वचेच्या सौंदर्यात अतिरिक्त चमक येते ते जाणून घ्या. (Do these massage to face skin everyday in winter for beautiful skin)

अधिक वाचा  : खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

खोबरेल तेलाने करा मालिश

चेहऱ्यासाठी तेलाची मालिश खूप फायदेशीर असते. नारळाचे तेलाचे आयुर्वेदातदेखील औषधी गुणधर्म सांगितले आहेत. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर आहेत. शुद्ध खोबरेल तेल त्वचा आणि केसांसाठी वरदान असते. म्हणूनच रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेलाने मसाज करणे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. याचा फायदा होत त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. चेहऱ्यावरील डागही दूर करण्यासाठीसुद्धा ही मालिश उपयोगी असते.

अधिक वाचा  : Multibagger stock : या एका शेअरवर मिळणार मोफत 9 शेअर्स, शिवाय शेअर स्प्लिट होत होणार 10 शेअर्स...गुंतवणुकदारांच्या शेअरवर उड्या

कोरफडची मालिश

कोरफडीत मोठे औषधी गुणधर्म आहेत. यामध्ये विविध महत्त्वाची जीवनसत्त्वे A, B1, B2, B3 आणि B6, C, E, फॉलिक ऍसिड, कोलीन, लोह, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम आणि मॅंगनीज सारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे पोषक घटक त्वचेसाठी फायदेशीर आहेत. त्वचेच्या सौंदर्यासाठी त्यांचा उपयोग होतो. यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्याला कोरफडीच्या जेलने मालिश करा. यामुळे चेहऱ्याला अतिरिक्त तेज येतो. कोरफडीच्या मालिशपणामुळे हिवाळ्यात त्वचेच्या कोरडेपणाची समस्याही दूर होते. कोरफडीच्या जेलमुळे काळे डागांच्या समस्येतूनही सुटका होते.

अधिक वाचा  : मेव्हण्याचं केलं अपहरण...खंडणी म्हणून मागितली वधू

मधाची मालिश

मध बहुगुणी असते. मध आरोग्यासोबतच त्वचेच्या सौंदर्यासाठीही फायदेशीर असते. यामध्ये नियासिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन आणि अमीनो अॅसिड आढळतात. यांचा उपयोग लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर अनेक आजारांवर होतो. मध संसर्ग रोखण्यासाठीदेखीळ फायदेशीर असते. रोज रात्री झोपण्यापूर्वी मधाने चेहऱ्याची मालिश केल्यावर चेहऱ्यावर तजेला येतो. मधाची मालिश झाल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. या मालिशमुळे त्वचा सुंदर होते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी