Yoga Day 2022: पोट कमी करण्यापासून ते चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी रोज १० मिनिट करा हा व्यायाम

तब्येत पाणी
Updated Jun 18, 2022 | 11:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

Yoga Day 2022 In Marathi | आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत. रोज योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. योगा करण्याचे अनेक प्रकार आहेत, जे शरीराच्या विविध भागांचे आरोग्य राखण्यासाठी केले जातात.

Do this exercise for 10 minutes daily to reduce the stomach and make your face glow
लठ्ठपणा आणि फिट राहण्यासाठी रोज १० मिनिटे करा हा व्यायाम   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत.
  • रोज योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
  • २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

Yoga Day 2022 In Marathi | मुंबई : आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत. रोज योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. योगा करण्याचे अनेक प्रकार आहेत, जे शरीराच्या विविध भागांचे आरोग्य राखण्यासाठी केले जातात. यामधील एक योगासन म्हणजे हलासन (Plow Pose), हा व्यायाम केल्याने एक नाही तर अनेक फायदे होतात. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासोबतच पोट फुगण्यापासूनही मुक्ती मिळते. चला तर म जाणून घेऊया हलासन केल्याने काय फायदे होतात आणि ते किती वेळ केले जाते. (Do this exercise for 10 minutes daily to reduce the stomach and make your face glow). 

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day) साजरा केला जातो. प्रत्येक माणसाच्या जीवनात योगांचा समावेश करणे हा यामागील उद्देश आहे. योगाच्या अनेक आसनांमध्ये हलासनाचीही मुद्रा असते. ज्याचे अनेक फायदे आहेत. 

अधिक वाचा : या जन्मतारखेच्या लोकांसाठी आजचा दिवस असणार खूप खास

चेहऱ्याची चमक वाढवते, केस गळणे थांबवते

दररोज १० मिनिटे हलासन केल्याने चेहऱ्यावर चमक येते. रक्ताभिसरण चांगले असणे हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. हलासन केल्याने रक्ताचे सर्कुलेशन चांगले होते, ज्यामुळे रक्त घट्ट होते. मुरुम आणि सुरकुत्यापासून आराम मिळतो. केसगळतीच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

पाठदुखीपासून होते सुटका

हलासन केल्याने पाठीचे आणि मणक्याचे स्नायू मजबूत होतात. यामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो. जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल, तर हलासनासाठी तुमच्या दिवसातील काही मिनिटे जरूर काढा. 

पोट कमी होण्यास मदत होते

हलासन केल्याने वजन वाढण्यापासून आराम मिळतो. यासोबतच पोटाची चरबीही हळूहळू संपते. जर तुम्ही अजून हलासन करत नसाल तर हळू हळू सराव करायला सुरुवात करा.

पोटाचे विकार दूर होतात

हलासनामुळे पोटाशी संबंधित विकार दूर होतात. ही योगासने केल्याने पोटाचे स्नायू सक्रिय होतात. त्यामुळे पोट, आतड्यांसह अनेक अवयवांना चालना मिळते. त्यामुळे पचनक्रिया बरोबर होते. गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी