Frozen Shoulder: तासन् तास बसून आखडले खांदे?, मग करा 'हे' सोपे व्यायाम; शरीर होईल मोकळे

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Sep 12, 2022 | 08:30 IST

Exercise For Frozen Shoulder: अनेकवेळा लॅपटॉपवर जास्त वेळ बसून काम केल्यानं खांदेदुखी (shoulder pain) सुरू होते आणि खांदे आखडतात (aching shoulders). अशा परिस्थितीत खांदा हलवणे कठीण होते. या स्थितीला फ्रोझन शोल्डर (frozen shoulder) म्हणतात.

Frozen Shoulder
खांदा आखडला आहे? मग त्यावर व्यायामानं करा उपचार 
थोडं पण कामाचं
  • अनेकवेळा लॅपटॉपवर जास्त वेळ बसून काम केल्यानं खांदेदुखी (shoulder pain) सुरू होते.
  • खांदे आखडतात (aching shoulders). अशा परिस्थितीत खांदा हलवणे कठीण होते. या स्थितीला फ्रोझन शोल्डर (frozen shoulder) म्हणतात.
  • फ्रोझन शोल्डरची समस्या सुरुवातीच्या टप्प्यात कळत नसली तरी जेव्हा ही समस्या वाढू लागते.

नवी दिल्ली: Frozen Shoulder exercise: सलग काही तास एकाच पोझिशनमध्ये बसून राहिल्यानं आपले शरीर दुखायला लागते. दिवसा आपल्याला हे फारसे जाणवत नाही. मात्र रात्री पाठ टेकवली की आणि सकाळी झोपेतून उठताना स्नायूंना आलेला ताण आपल्याला जाणवतो. अनेकवेळा लॅपटॉपवर जास्त वेळ बसून काम केल्यानं खांदेदुखी (shoulder pain) सुरू होते आणि खांदे आखडतात (aching shoulders).  अशा परिस्थितीत खांदा हलवणे कठीण होते. या स्थितीला फ्रोझन शोल्डर (frozen shoulder)  म्हणतात. फ्रोझन शोल्डरची समस्या सुरुवातीच्या टप्प्यात कळत नसली तरी जेव्हा ही समस्या वाढू लागते तेव्हा त्याचा त्रास असह्य होतो. तज्ज्ञांच्या मते हा त्रास रात्रीच्या वेळी जास्त होतो. फ्रोझन शोल्डरच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम केले जाऊ शकतात.   घरातली कामे, स्वयंपाक, बाहेरची कामे आणि ऑफीस या सगळ्या धावपळीत आपल्याला व्यायामाला वेळ मिळतोच असे नाही. पण आज आम्ही तुम्हाला सांगतो की फ्रोझन शोल्डरच्या समस्येवर कशी मात करता येऊ शकते ते. (Do this exercise for frozen shoulder read in marathi)

शोल्डर रोटेशन

तज्ज्ञांच्या मते, फ्रोझन शोल्डरच्या समस्येवर मात करण्यासाठी शोल्डर रोटेशनचा व्यायाम केला जाऊ शकतो. यामुळे खांद्याची मोबिलिटी सुधारते. त्यामुळे खांद्यांवरील ताणही दूर होतो. हे करण्यासाठी, सरळ बसा आणि नंतर दोन्ही खांदे बाहेरून आत फिरवा. नंतर आतून बाहेरून फिरवा. या स्टेप्स 8-10 वेळा करा.

नमस्कार हॅंड्स अप

जर तुम्हाला फ्रोझन शोल्डरचा त्रास होत असेल, तर सरळ बसा आणि दोन्ही हात जोडून नमस्ते म्हणा, यामुळेही दुखण्यापासून आराम मिळतो. हे करण्यासाठी, दोन्ही हात जोडून नमस्तेची स्थिती करा, नंतर नमस्ते स्थितीत दोन्ही हात वर करा आणि त्यांना परत खाली आणा. यामुळे खांद्यांना खूप आराम मिळेल.
 

अधिक वाचा-   मुंबईत प्रभादेवीत राडा, आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आमदार सुनिल शिंदेंचा आरोप

(अस्वीकरण: या लेखात दिलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी