Walking Benefits:नवी दिल्ली: हिवाळा (winter)सुरू झाला की, फिटनेस (Fitness) राखणे खूप कठीण होऊन बसते. व्यायामासाठी (exercise) वेळ काढणे हे त्याहूनही मोठे आव्हान असते. हे आव्हान अनेकांकडून पेलवले जात नाही. परंतु दीर्घकाळ वर्कआउटपासून दूर राहिल्याने लठ्ठपणा तसेच इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. व्यायामसाठी वेळ काढता येत नसेल तर एक सोपा उपाय म्हणजे पायी चालणे. पायी चालण्याने अनेक फायदे होत असतात. (Do this exercise for just 10 minutes a day to stay fit in winter)
अधिक वाचा : ट्विटरच्या निळी दांडीचा वाढला भाव, दरमहा भरावा लागेल शुल्क
रोज चालण्याने वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या गुडघेदुखीपासून आपली सुटका मिळत असते. बसणे, झोपणे आणि शारीरिक हालचाल कमी होत असल्याने हळूहळू गुडघ्यांना त्रास होत असतो. यामुळे दररोज चालण्याने धोके कमी होत असतात. ऑस्टिओपोरोसिसच्या रुग्णांसाठी नियमित चालणे खूप फायदेशीर आहे.
अधिक वाचा : फिटनेस सर्टिफिकेटपूर्वी सर्वसामान्यांसाठी पूल झाला होता खुला
दररोज चालणारे लोक केवळ हृदयानेच नव्हे तर मनानेही निरोगी असतात. सकाळी चालण्याने मेंदूला ताजा ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे तणाव आणि नैराश्य दूर होते.
दररोज चालण्याने कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो. चालणे ही केवळ वृद्धांपासून तरूणांसाठीच नव्हेतर लहान मुलांसाठीही अतिशय फायदेशीर क्रिया आहे. वृद्ध लोक आठवड्यातून फक्त एक तास जरी पायी चालले तरी ते दीर्घकाळ निरोगी राहू शकतात.