Weight loss: जिममध्ये न जाता वजन कमी करायचे आहे? हे उपाय केल्याने आठवड्याभरात जाणवेल फरक 

तब्येत पाणी
Updated May 26, 2022 | 11:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health News | वाढत्या वजनामुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत. सर्वचजण तंदुरूस्त शरीर ठेवण्यासाठी जिम आणि योगाचा सहारा घेत आहेत. फिटनेस ट्रेनिंग सेंटरमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत फिटनेसप्रेमींची ये-जा असते.

Do this home remedy for weight loss, you will notice the difference in a week
हे घरगुती उपाय केल्याने आठवड्याभरात वजन होईल कमी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाढत्या वजनामुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत.
  • वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
  • मेथीचे पाणी वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते.

Health News | मुंबई : वाढत्या वजनामुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत. सर्वचजण तंदुरूस्त शरीर ठेवण्यासाठी जिम आणि योगाचा सहारा घेत आहेत. फिटनेस ट्रेनिंग सेंटरमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत फिटनेसप्रेमींची ये-जा असते. कार्डिओ, धावणे, प्लँक पुशअप्स, ॲरोबिक्स आणि बरेच काही व्यायाम यांसारखे उपाय करून वजन नियंत्रणात आणण्यासाठी सर्वजण व्यस्त आहेत. या उपायांनी देखील वजन नियंत्रणात आणले जाऊ शकते. दरम्यान आज आपण जिममध्ये न जाता वजन कमी करण्यासाठीचे काही उपाय पाहणार आहोत. 

अधिक वाचा : अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई

लक्षणीय बाब म्हणजे शरीराला आकार (body shape) देण्यासाठी फक्त योग आणि व्यायाम पुरेसे नाहीत. यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही आवश्यक बदल देखील करावे लागतील.

 अधिक वाचा : पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड; VIDEO

वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स (Easy tips for weight loss)

  1. पुरेशी झोप घ्या - वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. कारण झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होते जे आरोग्यासाठी चांगले नसते. याशिवाय तुमच्या आहारात व्हिटॅमिन डीचा भरपूर समावेश करा.
  2. आवश्यक तेवढेच खा - लक्षणीय बाब म्हणजे एकाच वेळी भरपूर अन्न खाणे म्हणजे वजन वाढण्यास प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अशा स्थितीत कधीही जास्त खाऊ नये, तर नेहमी थोडे थोडे खावे. आहारात संपूर्ण धान्य, पातळ मांस, हिरव्या भाज्या इत्यादींचा समावेश करा.
  3. मेथीचे पाणी - मेथीचे पाणी वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते, अशा परिस्थितीत रोज सकाळी उठून मेथीचे पाणी प्या. यामुळे तुमची चयापचय क्रिया मजबूत होईल. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
  4. तुमचे जेवण स्वत: बनवा - जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर स्वतःच जेवण बनवा. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्यानुसार आणि चवीनुसार तेल आणि मसाला वापराल. यामुळे तुम्ही अतिरिक्त कॅलरीज घेणे टाळाल आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहील.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी