White Hair: ही एक गोष्ट केल्यास पांढरे होतील केस काळे...फक्त सकाळी वापरा

Hair Care Tips : जुन्या काळात केस पांढरे होणे हे वृद्धत्वाचे लक्षण मानले जात होते. परंतु सध्या 25 वर्षांच्या तरुणांचे केसही पिकू (White Hairs) लागले आहेत. अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूप वाढली आहे. आजची जीवनशैली, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते. केसांच्या (Hair problems) अनेक समस्यांना हल्ली आपल्याला तोंड द्यावे लागते.

Home remedies for black hairs
पांढरे केस सहजपणे काळे करण्याचे घरगुती उपाय 
थोडं पण कामाचं
  • केसांच्या समस्यांमध्ये हल्ली मोठी वाढ
  • अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे
  • केसांची काळजी घेण्यासाठी आणि केस काळे होण्यासाठी करण्याचे उपाय

Fenugreek For Premature White Hair : नवी दिल्ली : जुन्या काळात केस पांढरे होणे हे वृद्धत्वाचे लक्षण मानले जात होते. परंतु सध्या 25 वर्षांच्या तरुणांचे केसही पिकू (White Hairs) लागले आहेत. अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याची समस्या हल्ली खूप वाढली आहे. आजची जीवनशैली, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी हे यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते. केसांच्या (Hair problems) अनेक समस्यांना हल्ली आपल्याला तोंड द्यावे लागते. जर तुम्हीही लहान वयात या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुमचे टेन्शन दूर करू शकतो. केसांची काळजी घेण्यासाठी आणि केस काळे (Black Hairs) होण्यासाठी करण्याचे उपाय जाणून घ्या. (Do this to turn white hairs into black hairs)

अधिक वाचा : Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याचा कंटाळा आला आहे? हे आहेत सोपे उपाय

पांढर्‍या केसांवर मेथी ही रामबाण उपाय 

तरुण वयात केस पांढरे झाल्याने लाजिरवाणे वाटते. त्याचबरोबर आत्मविश्वासदेखील खाली येतो. कारण पांढऱ्या केसांमुळे आपले सौंदर्य कमी होते, त्याचबरोबर आपल्या दिसण्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो. आपल्या व्यक्तिमत्वातील रुबाब कमी होतो. केस काळे करण्यासाठी केमिकल युक्त हेअर डाईचा वापर केल्यास केस खराब होऊ शकतात, अशा परिस्थितीत मेथीचा वापर केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतो.

अधिक वाचा : Dark Circles :डोळ्याखालील काळ्या वर्तुळांमुळे वैतागला आहात? या घरगुती उपायांनी चटकन होईल सुटका

पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी उपाय-

मेथीसोबत गुळाचे सेवन करावे
पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे व्हायचे असतील तर मेथीसोबत गुळाचे सेवन सुरू करा. आयुर्वेदातही हे दोन्ही एकत्र करण्याचे फायदे सांगितले आहेत. मेथी आणि गुळामुळे केसांच्या समस्या दूर होतातच परंतु त्याचबरोबर केस गळणे, टक्कल पडणे यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते आणि केसांना आश्चर्यकारक चमक येते.

मेथीच्या पाण्याने डोके धुवा
केसांच्या फायद्यासाठी मेथीचा वापर इतर प्रकारेही केला जाऊ शकतो, यासाठी तुम्ही एका भांड्यात पाणी ठेवा आणि मेथीचे दाणे मिसळा. त्यानंतर ते उकळवा आणि नंतर थंड होऊ द्या. या मेथीच्या पाण्याने डोके धुवा आणि सुमारे 15 मिनिटे केस धुवू नका. असे काही दिवस केल्याने इच्छित परिणाम मिळेल.

अधिक वाचा : Super Foods : आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी पाच आश्चर्यकारक सुपरफूड...आठवड्यातून दोनदा खा आणि जादू पाहा...

हे काम सकाळी करा
तुम्ही मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी लवकर बारीक करून पेस्ट बनवा आणि केसांना लावा, काही दिवस ही पद्धत अवलंबल्यास केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

पाऊस पडल्यावर जितका आनंद होतो तितकीच भीती केसांची असते कारण अशा परिस्थितीत केस खूप गळायला लागतात. पावसाळा हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट मानला जातो. हवामानातील आर्द्रतेमुळे केस तुटण्यास सुरुवात होते, त्यामुळे या ऋतूत केसांची चांगली काळजी घेणे (Hair care) खूप गरजेचे आहे.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी