How to remove Dark Circles : नवी दिल्ली : डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circles)येण्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याचे कारण म्हणजे आपण दिवसभर कॉम्प्युटरसमोर तासनतास काम करतो, पुरेशी झोप न घेणे आणि फोन अधिक वापरणे इत्यादी सवयींमुळे काळी वर्तुळे येण्याचा धोका वाढतो. चेहऱ्यावरील काळी वर्तुळे लपविणेही सोपे नाही. मेकअपने ती काही काळ लपवता येतात, पण ती पूर्णपणे काढून टाकणे सोपे नसते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही काळ्या वर्तुळांपासून म्हणजे डार्क सर्कल्सपासून मुक्ती मिळवू शकता. (Do you have dark circles, this is how you can remove it)
अधिक वाचा : Super Foods : आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी पाच आश्चर्यकारक सुपरफूड...आठवड्यातून दोनदा खा आणि जादू पाहा...
बटाट्याचा रस-
बटाट्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. बटाट्याचा रस काळ्या वर्तुळांवर सतत लावल्याने ते हळूहळू कमी होतात. हे लावण्यासाठी प्रथम बटाटा किसून घ्या. नंतर त्यात बटाट्याचा रस काढा. त्यानंतर कापसाच्या मदतीने बटाट्याचा रस डोळ्यांखाली आणि आजूबाजूला लावा.
थंड चहाच्या पिशव्या
चहाच्या पिशव्यामध्ये कॅफिन असते जे रक्तवाहिन्या आकुंचन करण्यास मदत करते आणि रक्त प्रवाह वाढवते ज्यामुळे काळी वर्तुळे कमी होतात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रीन टी बॅगचा वापर केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होऊ लागतात.
अधिक वाचा : Heart Health: हे लाल-गोड फळ आहे हृदयाचे मित्र...यामुळे कमी होतो हृदयविकाराचा धोका
थंड दूध-
थंड दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. काळी वर्तुळे कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. यासाठी एका भांड्यात थंड दूध घ्यावे लागते. आता कापसाच्या मदतीने ते थंड दूध डोळ्यांखाली लावावे लागते. 10 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात.
प्रत्येकाला सुंदर आणि गोरे दिसायचे असते. गोरेपणाची ही क्रेझ केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही आहे. चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशनमुळे चेहरा काळा दिसू लागतो. तसेच धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याचा ग्लो कमी होतो. चेहरा गोरा बनवण्यासाठी लोक विविध प्रकारचे स्किन केअर प्रॉडक्ट वापरतात. संवेदनशील त्वचेसाठी हे प्रॉडक्ट हानिकारक ठरु शकतात. याच्या वापराने काही दिवस चेहऱ्यावर फरक दिसतो मात्र त्यानंतर त्वचेसाठी हानिकारक ठरतात.
अधिक वाचा : Cholesterol Level : कोलेस्ट्रॉल वाढणे ही धोक्याची घंटा, या 6 गोष्टींची घ्या काळजी
दुधामध्ये नैसर्गिक पोषकतत्वे आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे स्किन टोन सुधारते. हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा दुधाच्या सायीमध्ये चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी चेहरा धुवा. असे आठवड्यातून दोनवेळा करा.
टोमॅटोच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवून घ्या. हा पॅक संवेदनशील चेहऱ्यासाठी चांगला आहे.
चेहरा गोरा करण्यासाठी चंदन पावडरचा उपाय सगळ्यात बेस्ट. पॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि ४ थेंब बदाम तेल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्याला पोषण देईल तसेच डार्क स्पॉट कमी करुन चेहऱ्याची त्वचा उजळेल.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)