Boiled Egg Water : अंडी उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देता काय? हे फायदे जाणून घेतल्यावर करणार नाही तसे...

Egg Tips : रविवारी किंवा सोमवारी अंडी (Eggs) खा, आरोग्यासाठी अंड्यांचे फायदे लक्षात घेता, ही म्हण तुम्ही लहानपणापासून ऐकली असेल. अंडी ही प्रोटिनसाठी चांगली असतात. अंड्यांचे अनेक फायदे (Benefits of Eggs) असतात. अनेकजणांच्या आहारात अंड्यांचा नियमित वापर असतो. अंड्यांच्या अनेक रेसिपी भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. अशा या बहुगुणी अंड्यांबद्दल तर तुम्हाला अनेक गोष्टी माहित असतील. परंतु अंड्यांशी संबंधित एक गोष्ट अशी आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल.

Benefits Of Boiled Egg Water
अंडी ज्या पाण्यात उकळतात त्याचे फायदे 
थोडं पण कामाचं
  • अंड्यांचे अनेक फायदे असतात
  • जगभर अंड्यांच्या अनेक रेसिपी लोकप्रिय
  • अंडी ज्या पाण्यात उकडली जातात त्याचेही असतात अनेक फायदे

Benefits Of Boiled Egg Water : नवी दिल्ली : रविवारी किंवा सोमवारी अंडी (Eggs) खा, आरोग्यासाठी अंड्यांचे फायदे लक्षात घेता, ही म्हण तुम्ही लहानपणापासून ऐकली असेल. अंडी ही प्रोटिनसाठी चांगली असतात. अंड्यांचे अनेक फायदे (Benefits of Eggs) असतात. अनेकजणांच्या आहारात अंड्यांचा नियमित वापर असतो. अंड्यांच्या अनेक रेसिपी भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. अशा या बहुगुणी अंड्यांबद्दल तर तुम्हाला अनेक गोष्टी माहित असतील. परंतु अंड्यांशी संबंधित एक गोष्ट अशी आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. ही बाबा आहे अंडी उकळ्यासाठी जे पाणी वापरले जाते त्याची. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, उकडलेल्या अंड्याचे उरलेले पाणी ( Boiled Egg Water)कसे फायदेशीर ठरू शकते. पण हे खरे आहे. चला जाणून घेऊया उकडलेल्या अंड्यातील उरलेले पाणी कसे फायदेशीर आहे. (Do you know benefits of Boiled Egg Water, check details)

अधिक वाचा : Hair Care: तरूणाईतच केस होतायत पांढरे? मेहंदी आणि रंगाशिवाय या सोप्या पद्धतीने करा काळे 

उकडलेल्या अंड्याच्या उरलेल्या पाण्याचे फायदे-

पोषक तत्त्व-

पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम आणि थोड्या प्रमाणात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सोडियम अंड्याच्या शेलमध्ये म्हणजे कवचामध्ये आढळतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही अंडे उकळता तेव्हा हे घटक पाण्यात मिसळतात. हे सर्व घटक वनस्पतींसाठी खूप फायदेशीर आहेत. वनस्पतींना त्यांच्या पेशींच्या विकासासाठी या सर्व घटकांची आवश्यकता असते.

खताचे काम

उकडलेले अंड्याचे पाणी किंवा अंड्याचे कवच झाडांसाठी खत म्हणून काम करतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याची पुष्टी झाली आहे. हॅमिल्टनच्या मास्टर्स गार्डनर यांनी हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाच्या अहवालानुसार, तुम्ही ज्या पाण्यात अंडी उकळता. त्या पाण्यात अंडी उकळल्यानंतर अंड्यातील काही पोषक तत्त्वे येतात, जे झाडांसाठी खत म्हणून काम करतात.

अधिक वाचा : Namkeen Side Effects: चहासोबत खारट खाणाऱ्यांनो सावधान! चहासोबत खारट पदार्थ खाल्ल्याने होऊ शकतात खूप गंभीर आजार

टोमॅटोच्या रोपांसाठी फायदेशीर

अंड्यांचे उकळलेले पाणी अशा झाडांसाठी खूप फायदेशीर आहे जे बर्याचदा सूर्यप्रकाशाअभावी खराब होतात. हे पाणी विशेषतः टोमॅटो आणि मिरचीच्या झाडांसाठी उपयुक्त आहे.

अर्थात अंडी जरी आरोग्यासाठी चांगली असली तरी त्याच्या अती खाण्याने दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

अधिक वाचा : How to boost Good Cholesterol: रक्तवाहिन्या ब्लॉक करणाऱ्या खराब कोलेस्टेरॉलपासून आता होईल सुटका; या गोष्टी वाढवतात चांगले कोलेस्टेरॉल

चांगले कोलेस्ट्रेरॉल शरीराच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते जे अंड्यांमध्ये चांगल्या प्रमाणात आढळते. पण खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएलच्या अतिसेवनामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो. अंडी शरीरासाठी खूप फायदेशीर असतात मात्र त्यांचे सेवन अधिक प्रमाणात केल्याने त्याचे दुष्परिणाम जाणवू शकतात.

दरम्यान, जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने पोटात सूज येऊ शकते. त्यामुळे एका दिवसात २ पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. दिवसभरात २-३ पेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. तसेच जास्त अंडी खाल्ल्याने त्वचेवर फोड्या येऊ शकतात, तर काही लोकांना संपूर्ण त्वचेवर फोड्यांची ॲलर्जी होऊ शकते. जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो. त्यामुळे डायबिचीजची समस्या वाढण्याची शक्यता आहे. अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी