Reverse Dieting Meaning & Benefits : नवी दिल्ली : वजन कमी करण्यासाठी लोक व्यायामापासून ते डाएटिंगचा अवलंब करतात. सगळ्यांनाच माहीत आहे की, डाएटिंगचे काही मूलभूत नियम आहेत, जे लक्षात घेऊन तुमचे डाएटिंग किंवा आहार यशस्वी होऊ शकतो. हे तर झाले डाएटिंगबद्दल, पण तुम्हाला रिव्हर्स डायटिंगबद्दल माहिती आहे का? रिव्हर्स डाएडिंग म्हणजे काय त्याचे फायदे काय असतात हेदेखील तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. चला तर मग, रिव्हर्स डाएटिंग म्हणजे काय ते जाणून घ्या- (Do you know Reverse Dieting? how it is beneficial in weight control?)
अधिक वाचा : Weight Loss Tips: पोटाच्या चरबीवर रामबाण उपाय! या पद्धतीने लिंबूचे सेवन केल्यास झपाट्याने वजन होईल कमी
जेव्हा तुम्ही डायटिंगवर असता तेव्हा तुम्ही आहारात कमी कॅलरीज घेता, त्यामुळे चरबीवर नियंत्रण ठेवता येते, पण तुमचा आहार पूर्ण झाल्यावर तुम्ही पुन्हा पूर्वीप्रमाणेच आहार घेण्यास सुरुवात करता. त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण पुन्हा अचानक वाढू लागते. अशा परिस्थितीत रिव्हर्स डाएटिंग खूप उपयुक्त आहे. रिव्हर्स डाएटिंगमध्ये, लोक हळूहळू त्यांच्या आहारात कॅलरी समाविष्ट करतात, जेणेकरून वजन पुन्हा वाढू नये.
जर कोणाला वजन नियंत्रणात ठेवून जास्त अन्न खावेसे वाटत असेल.
जर एखाद्याला शरीरातील चयापचय वाढवायचे असेल. जर एखादी व्यक्ती थोड्या प्रमाणात कॅलरीज घेतल्यामुळे सतत भुकेली असेल आणि आपण त्यातून आजारी पडत असाल. जर तुम्ही खूप कमी कॅलरीज खात असाल आणि अशक्त वाटत असाल.
अधिक वाचा : Garlic for Weight Loss : दररोज सकाळी लसूण खा आणि वजन घटवा
वाढलेले वजन फक्त अनेक आजारांनाच आमंत्रण देत नाही तर तुमची पर्सनॅलिटी देखील खराब करत असते. त्यामुळे वजन कमी करणे अथवा नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक आहे. लक्षणीय बाब म्हणजे वजन कमी करण्यासाठी लिंबू तुमची मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त याचे सेवन करण्याची योग्य पद्धत माहिती असली पाहिजे. तत्पुर्वी, जाणून घेऊया नेमकं वजन कशामुळे वाढते? दरम्यान यामागे प्रमुख तीन कारण असण्याची शक्यता आहे. एक म्हणजे अनियंत्रित आहार, दुसरे म्हणजे चुकीची जीवनशैली आणि तिसरे म्हणजे शारीरिक हालचाल न करणे.