मुंबई: शेवग्याच्या पाल्याची भाजी(drumstick leaves) ही सगळ्यात पौष्टिक भाजींपैकी एक आहे. शेवग्याच्या शेंगा(drumstick) सगळीकडेच खाल्ल्या जातात. मात्र याचा पाला आणि फुलांची भाजीही अतिशय चविष्ट होते. शेवगा हे एक जबरदस्त सुपरफूड(superfood) आहे. शेवग्याच्या पाल्याचा पराठाही आवडीने खाल्ला जातो तसेच तो पौष्टिकही असतो. शेवग्याच्या पाल्यामध्ये शरीरासाठी आवश्यक मल्टिव्हिमानिस्, अँटीऑक्सिडंट आणि अमिनो अॅसिड असतात. शेवग्याच्या पानांचा वापर खाण्याव्यतिरिक्त आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो. अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठी शेवग्याच्या पाल्याचा वापर करतात. याचा ज्यूस प्यायल्याने अनेक फायदे होतात. Do you know the health benefit of drumstick leaves
अधिक वाचा - वडापाव घेणाऱ्या सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत
शेवग्याच्या पाल्यामध्ये आढळणारे गुण डायबिटीजची समस्येवर अतिशय फायदेशीर आहेत. शरीरात ब्लड शुगरचा स्तर संतुलित कऱण्यासाठी शेवग्याचा पाला अतिशय फायदेशीर मानला जातो. दरम्यान, डायबिटीजच्या समस्येमध्ये शेवग्याच्या पाल्याचा रस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
शेवग्याच्या पाल्यामध्ये अँटी ओबेसिटी गुण आढळतात. याच्या सेवनाने लठ्ठपणासाठी फायदा होतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही शेवग्याच्या पाल्याचा रस पिऊ शकता. दरम्यान, आजकालच्या असंतुलित खाणेपिणे आणि जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाची समस्या सतावत आहे. अशातच तुम्ही वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा ज्यूस पिऊ शकता.
हाडांच्या समस्येसाठी शेवग्याचा पाला अतिशय फायदेशीर आहे. शेवग्यामध्ये कॅल्शियन, मॅग्नेशियम, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते जे हाडे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय गरजेचे असते. शेवग्याच्या पानांच्या ज्यूसने ऑस्टियोपोरोसिसच्या समस्येमध्ये खूप फायदा मिळतो.
शेवग्याच्या पानांचा रस रक्त साफ करण्यासाठी फायदेशीर ठरतो. शेवग्याच्या पानांमधील गुण रक्त डिटॉक्सिफाय करण्याचे करताता. याचा ज्यूस प्यायल्याने शरीराती विषारी पदार्थ युरिनच्या माध्यमातून बाहेर फेकले जातात. दरम्यान, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सेवन करा.
अधिक वाचा - पोटाची चरबी ३ महिन्यात होईल कमी, फक्त करा या सोप्या टिप्स
पोटाशी संबधित समस्या दूर करण्यासाठी शेवग्याचा पाला अतिशय फायदेशीर ठरतो. याचे सेवन केल्याने पोटदुखीच्या समस्या दूर होतात. तसेच पोटात अल्सरपासून फायदा मिळतो.