Best Time to Drink Green Tea: ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का?

Green Tea Advantages: ग्रीन टी आरोग्यासाठी खूप लाभदायक आआहे. सकाळी ग्रीन टी प्यायल्यानं तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. ग्रीन टी प्यायल्यानं केवळ वजन कमी होत नाही तर बऱ्याच आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

Drink Green Tea
Drink Green Tea: 'ही' आहे ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ  

मुंबईः ग्रीन टीचे बरेच फायदे असतात. असं म्हटलं जातं की, ग्रीन टी प्यायल्यानंतर तुम्ही दिवसभर अॅक्टिव्ह राहतात. याव्यतिरिक्त हे मेटाबॉलिज्म सुद्धा बूस्ट करतं. हेच कारण आहे की, ग्रीन टी अनेक प्रकारे शरीरासाठी फायदेशीर आहे. दररोज 2 ते 3 कप ग्रीन टी प्यायल्यानं हेल्दी लाइफस्टाइल जगू शकता. याव्यतिरिक्त ग्रीन टीमध्ये एंटीऑक्सिडेंट्स असतात. जे शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. मात्र काही लोकांना ग्रीन टी बनवण्याची योग्य प्रक्रिया माहित नसते. तसंच  काही लोकांना ग्रीन टी बनवण्याची प्रक्रिया माहित नसते. याव्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही वेळी ग्रीन टी पिऊ नये. अशातच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ग्रीन टी कधी आणि कशा पद्धतीनं प्यावी. 

सकाळी- सकाळी ग्रीन टी पिणं चांगलं आहे का?

सकाळी-सकाळी ग्रीन टी पिणं एक चांगला ऑप्शन नाही आहे. बऱ्याचंदा हे तुमच्या पोटाचा बॅलन्स बिघाडू शकतो. अशात सकाळी सकाळी ग्रीन टी पिण्याऐवजी तुम्ही गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकून पिऊ शकता. असं करणं तुमच्यासाठी जास्त हेल्दी ठरेल. 

दिवसभरात किती वेळा प्यावी ग्रीन टी 

ग्रीन टी एंटीऑक्सिडेंट्स असतं. अशात दिवसभरात तीन वेळा तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. यापेक्षा जास्त घेतल्यानं फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतो. याव्यतिरिक्त खाल्ल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिणं चुकीचं ठरेल. 

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ काय? 

खाल्ल्यानंतर एक तासानंतर ग्रीन टी प्यावी. त्यासोबतच खाण्याआधी अर्धा तासापूर्वीही तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. 

दिवसभरात कधी ग्रीन टी पिऊ नये? 

खाल्ल्यानंतर तात्काळ ग्रीन टी पिऊ नये. कारण हे तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवू शकता. झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिऊ नते. काही लोकं ग्रीन टीमध्ये साखर मिसळतात, मात्र ही एकदम चुकीची पद्धत आहे. साखरेऐवजी तुम्ही मधाचा वापर करु शकता. तसंच औषध घेतल्यानंतर किंवा गर्भवती महिलांनी ग्रीन टी पिऊ नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...