मुंबईः तुम्ही एखाद्यास झोपेत बोलताना ऐकले असेल किंवा अशा लोकांबद्दल ऐकले असेल. झोपेत बोलण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. लोक याकडे सहजपणे दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. डॉक्टरांच्या मते याकडे दुर्लक्ष केल्यास याचे रुपांतर स्लीपिंग डिसऑर्डरमध्ये होऊ शकते.
तुमच्या जवळच्या व्यक्तीस स्लीपिंग डिसऑर्डर हा त्रास होत असेल तर, हा लेख नक्की वाचा आणि या समस्येपासून सुटका मिळवा. या समस्येचे नेमके कारण काय? किंवा याची लक्षणे व उपाय जाणून घ्या.
डॉक्टरांच्या मते ही समस्या स्लीपिंग डिसऑर्डर असणाऱ्यांना होते. अशी माणसे झोपेत स्वतःसोबत गप्पा मारायला लागतात. ते आपल्याला अस्पष्टपणे ऐकू येते. ही समस्या वृद्ध आणि लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. या त्रासाला पॅरासोमेनिया असेही म्हणतात. यावर योग्य ते उपाय केल्यास यापासून सुटका मिळू शकते. त्यासाठी शरीर आणि मानसिकता सांभाळणे खूप महत्वाचे असते. योग्य आहार आणि व्यायाम यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
बदलती जीवनशैली
चुकीची आहारपद्धती
तणावग्रस्त जीवन
वाढत्या कामाचं ओझं
शारीरिक थकवा
अवेळी झोपणे
सतत झोपेत बोलण्याच्या समस्येपासून मुक्त व्हायचे असल्यास सर्वात महत्वातचे आहे ते तणावमुक्त राहणे. कसल्याही प्रकारचा ताण व्यवस्थित हाताळणे गरजेचे आहे. यासाठी झोपेची वेळ निश्चित करणे महत्वाचे आहे. झोपतेवेळी नेहमी आपल्या पाठीवर झोपले पाहिजे. पालथे झोपणे टाळावे. योग्य आहारावर लक्ष केंद्रीत करून शरीरास उपयुक्त आहार घ्यायला हवा. या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी नियमीत व्यायाम करणेही अत्यंत गरजेचे आहे. त्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते व अशा समस्या कमी उद्भवतात. त्याचबरोबर, आपले मन शांत ठेवावे. मानसिक स्वास्थ्य सांभाळणेही तितकेच महत्वाचे आहे. या सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही झोपेत बोलण्याच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.