Facts about eggs: संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं नेहमी म्हटलं जातं. अंडी हे अनेकांचं आवडतं खाद्य आहे. हाय प्रोटीनयुक्त अंडी आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे देतात. इतके फायदे असतानाही गैरसमजांमुळे अनेकजण अंडी खाणे टाळतात. जाणून घेऊयात असे कोणते गैरसमज आहेत आणि त्यामागचं सत्य नेमकं काय आहे.
अंड्यांच्या संदर्भात सर्वात सामान्य असा गैरसमज म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल असल्याने हे हृदयासाठी धोकादायक आहे. मात्र, अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, डाएटरी कोलेस्ट्रॉल रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवत नाही.
हे पण वाचा : तेल लावल्यानंतरही केस का गळतात? वाचा कारणे आणि उपाय
कंच्च्या अंड्याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कच्च्या अंड्यात साल्मोनेला सारखे बॅक्टेरिया असू शकतात. जे फूड पॉयझनिंगचे कारण ठरू शकतात. यामुळे उलटी, ताप यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अंडे शिजवून खाल्ल्याने बॅक्टेरिया मरुन जातात आणि मग ते खाण्यासाठी सुरक्षित बनतात.
हे पण वाचा : खजूर खाल्ल्याने आरोग्याला होतात तुफान फायदे
अंड्याच्या संदर्भात आणखी एक गैरसमज सुद्धा आहे आणि तो म्हणजे केवळ अंड्याचा सफेद भाग हा पौष्टिक असतो. पण खरं म्हणजे अंड्यातील आतल्या पिवळ्या भागात (बलक) व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के याच्यासह अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात जे अंड्याचा सफेद भागात उपलब्ध नसतात.
हे पण वाचा : या 10 भाज्या आहेत कॅन्सरच्या शत्रू, खाल्ल्यास कर्करोगाचा धोका होईल दूर
अनेकांचा समज असतो की अंडी खाल्ल्याने वजन वाढते मात्र, अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, अंड्यात प्रोटीन अधिक असते. जे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही कमी खाता.
अनेकांना वाटते की, ब्राऊन अंडी ही पांढऱ्या अंड्यापेक्षा अधिक पौष्टिक असतात. मात्र, अंड्यांच्या रंगावरुन त्याची पौष्टिकता आणि गुणवत्ता यावर कोणताही प्रभाव पडत नाही.
हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?
हा दावा काहीजण करतात मात्र, या दाव्याचा कोणताही ठोस पुरावा नाहीये. दररोज अंडी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो याला कोणताही पुरावा किंवा अभ्यास नाहीये. अंड्यात असे काही पोषकतत्वे असतात जे महिलांमधील स्तनाचा कर्करोगाचा धोका कमी करतात.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नका. या संदर्भात आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)