Mouth Ulcer Remedies: पोटाच्या उष्णतेमुळे तोंडात फोड येतात का? उपायासाठी वाचा या 3 टिप्स, खर्च येईल फक्त 5 रुपये

तुम्हाला पोटाच्या उष्णतेचा त्रास होतो का? पोट बिघडल्यामुळे तोंडात जखम होते का? या अल्सरमुळे (ulcer)तुम्हाला कोणतेही अन्न ( food) खाण्यात किंवा गिळण्यात अडचणी येत आहेत का? या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 3 प्रभावी उपाय सांगत आहोत.

Does stomach heat cause mouth Ulcer?
Mouth Ulcer : पोटाच्या उष्णतेमुळे तोंडात फोड येतात का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तोंड आले असेल तर हळद पावडर घ्या त्यात थोडं पाणी टाका आणि त्याची एक घट्ट पेस्ट बनवा.
  • मिठात जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्याच्या वापराने तोंडाचे व्रण बरे होण्यास मदत होते.
  • मध हे अनेक नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध मानले जाते, ते अल्सरसाठी उपयोगी असते.

Tips For Mouth Ulcer Remedies: तुम्हाला पोटाच्या उष्णतेचा त्रास होतो का? पोट बिघडल्यामुळे तोंडात जखम होते का? या अल्सरमुळे (ulcer)तुम्हाला कोणतेही अन्न ( food) खाण्यात किंवा गिळण्यात अडचणी येत आहेत का? या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला 3 प्रभावी उपाय सांगत आहोत. या उपायासाठी फक्त पाच रुपये इतका खर्च येणार आहे. विशेष  म्हणजे यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे देखील जाण्याची गरज राहणार नाही.   (Does stomach heat cause mouth Ulcer? Read these 3 tips for solution, it will cost only 5 rupees)

अधिक वाचा  : अरे देवा! ब्ल्यू टिकसाठी शुल्क आकारलं तरी वाढले फेक अकाउंट

हळद पावडरचा उपयोग 

ही पावडर प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. आयुर्वेदात हळद एक औषध असल्याचं सांगितलं आहे. तोंड येत असेल तर हळदही त्यासाठी एक रामबाण उपाय आहे. तोंड आले असेल तर हळद पावडर घ्या त्यात थोडं पाणी टाका आणि त्याची एक घट्ट पेस्ट बनवा.यानंतर सुमारे एक आठवडा ही पेस्ट दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या तोंडाच्या अल्सरवर लावा. काही दिवसातच त्याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल. या पेस्टचा वापर केल्याने तुम्हाला तोंडाच्या संसर्गापासून आणि दुखण्यापासूनही आराम मिळेल.

अधिक वाचा  :  एकादशी आणि रविवारी तुळशीला का अर्पण नाही करत जल?

मीठ पाणी खूप फायदेशीर 

जर तुमच्या तोंडात फोड आले असतील तर तुम्ही मिठाचे पाणी देखील वापरू शकता. मिठात जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्याच्या वापराने तोंडाचे व्रण बरे होण्यास मदत होते. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचे मीठ मिसळा. यानंतर, ते मिश्रण (सोडियम वॉटर) चमच्याने चांगले हलवून थोडी-थोडी चूळ भरा.  हे  केल्याने तोंडाच्या अल्सरला आराम मिळतो आणि संसर्गही कमी होतो.

मधाच्या वापराने तोंडाच्या अल्सरला मिळतो आराम 

मध हे अनेक नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध मानले जाते. तोंडाचे संक्रमण किंवा अल्सर दूर करण्यासाठीही तुम्ही मधाचा वापर करू शकता.  तोंड आले असेल आणि छाले घालवयाचे असतील तर एका बोटावर मध घ्या आणि ते छाले असतील त्या ठिकाणी लावा. काही वेळानंतर, जेव्हा तुमच्या तोंडात लाळ तयार होऊ लागते, तेव्हा ते थुंकून न टाकता ते गिळून घ्या. मध लावण्याची क्रिया दिवसातून चारवेळा केल्यानेत तुम्हाला अल्सरपासून आराम मिळेल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीचा अंमल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. टाइम्स नाऊ याची पुष्टी करत नाही.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी