Snoring Problem: नवऱ्याच्या घोरण्याने रात्री झोप मोड होते का? मग पटकन करा हे चार घरगुती उपाय

घोरणे (Snoring) ही अशी समस्या आहे की ज्याचा त्रास अनेकांना होतो, परंतु ही समस्या स्वत: ऐवजी इतरांमुळे उद्भवते. रात्री घोरण्याचा आवाज जास्त येत असतो, त्यामुळे शेजारी झोपलेल्या व्यक्तीची झोप मोड होत असते. जेव्हा श्वसन (respiratory) यंत्रणेत काही अडथळा उत्पन्न होतो, तेव्हा झोपण्यावेळी आतील सेल्सच्या कंपनामुळे हा आवाज येत असतो. 

Snoring Problem
Snoring Problem: नवऱ्याच्या घोरण्याने रात्री झोप मोड होते का?   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • जेव्हा श्वसन यंत्रणेत काही अडथळा उत्पन्न होतो, तेव्हा झोपण्यावेळी आतील सेल्सच्या कंपनामुळे हा आवाज येत असतो.
  • पुदीना अनेक रोगांवरील रामबाण उपाय आहे.
  • घोरण्याच्या समस्येवरही हळद प्रभावी असते. यासाठी झोपण्याआधी एका ग्लासभर हळदीचं दूध प्यावे.

Home Remedies for Snoring: नवी दिल्ली:  घोरणे (Snoring) ही अशी समस्या आहे की ज्याचा त्रास अनेकांना होतो, परंतु ही समस्या स्वत: ऐवजी इतरांमुळे उद्भवते. रात्री घोरण्याचा आवाज जास्त येत असतो, त्यामुळे शेजारी झोपलेल्या व्यक्तीची झोप मोड होत असते. जेव्हा श्वसन (respiratory) यंत्रणेत काही अडथळा उत्पन्न होतो, तेव्हा झोपण्यावेळी आतील सेल्सच्या कंपनामुळे हा आवाज येत असतो.  या घोरण्याच्या आवाजामुळे घरातील अनेकजण त्रासलेले असतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं घोरणं बंद करायचं असेल तर पटकन घरगुती चार उपाय करा अन्  रात्री निवांत झोपी जा. 

घोरण्यापासून सुटका देतात घे घरगुती उपाय

पुदीना

पुदीना अनेक रोगांवरील रामबाण उपाय आहे. या पुदीन्याचे पाने पाण्यात उकाळून प्यायल्याने घोरण्यावर फरक पडत असतो. जर मिंट ऑयलचे काही थेंब रात्री झोपण्याआधी नाकात टाकल्याने श्वास घेण्याची समस्या राहत नाही.

हळद (Turmeric)

हळदीमुळे अनेक आजार बरे होत असतात. घोरण्याच्या समस्येवरही हळद प्रभावी असते. यासाठी झोपण्याआधी एका ग्लासभर हळदीचं दूध प्यावे. यात अँण्टी इंफ्लेमेटरी आणि अँण्टी बायोटिक गुण असतात. ज्यामुळे नाकेतील कंजेशन दूर होत असते. ज्याने घोरणं बंद होत असतं.

ऑलिव ऑयल (Olive Oil)

ऑलिव ऑयलच्या औषधी गुणांविषयी आपल्याला माहिती आहे. हे त्वचेसाठी मॉइस्चराइच परंतु खूप कमी लोकांना याची माहिती आहे. जैतूनचं तेल घोरणं बंद करत असतो. रात्री झोपेच्या वेळी या तेलाची काही थेंब नाकात टाकावे. यामुळे सूज कमी होऊन श्वास घेण्यास होणारा अडथळा दूर होत असतो.

लसूण (Garlic)

नोज साइनसमुळे घोरण्याची समस्या निर्माण होत असते. अशात लसणाच्या काही पाकळ्यांचं सेवन करणं गरजेचं आहे. लसणाला भाजून पाण्यासोबत प्यायल्याने घोरण्याची समस्या बंद होत असते.

(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपाय आणि समान्य गृहतिकांवर अवलंबून आहे. हे उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टाइम्स नाउ मराठी याची जबाबदारी घेत नाही..)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी