Monsoon Diet Tips: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या गोष्टी, जाणून घ्या पावसाळ्यातला योग्य आहार

तब्येत पाणी
Updated Jul 19, 2021 | 12:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Monsoon Health Tips: पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे असते, कारण या काळात अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आरोग्यपूर्ण आहार हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतो.

Monsson diet tips
पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका या गोष्टी, जाणून घ्या पावसाळ्यातला योग्य आहार  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • अनेक रोग आणि आजारांच्या संक्रमणाचा वाढतो धोका
  • प्रथिनेयुक्त आहार शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक
  • शिजवलेल्या अन्नाचे करा सेवन, कच्च्या, पाने असलेल्या, समुद्री गोष्टी टाळा

नई दिल्ली: पावसाळ्याचा ऋतू (Monsoon season) सर्वांनाच आवडत असेल तरी या काळात अनेक रोग (diseases) किंवा आजारांचा (ailments) संसर्ग (infection) होण्याचा धोका (risk) असतो. तसेच डासांमार्फत (mosquitoes) पसरणाऱ्या रोगांचाही धोका असतो. तज्ञ (experts) सांगतात की या काळात रोगप्रतिकारशक्ती (immunity) वाढवण्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात (daily life) काही बदल (changes) करावेत. यासाठी नियमित (regular) आणि आरोग्यपूर्ण आहार (healthy diet) गरजेचा आहे. अनेक संशोधने (researches) सांगतात की आपल्या आहाराचा परिणाम (effect) आपल्या शारीरिक (physical) आणि मानसिक आऱोग्यावर (mental health) होतो. पावसाळ्याच्या दिवसात आहार (diet) आणि रोज व्यायाम (exercise) हा महत्त्वाचा असतो.

जाणून घ्या कसा असावा पावसाळ्यातला आहार

साफ पाणी प्या

अनेक लोक आपल्या घरी बोअरवेल किंवा नळाचे पाणी पितात जे पावसाळ्याच्या दिवसात हानीकारक असू शकते. या पाण्यात अनेक जिवाणू पावसाळ्यात वाढतात ज्यामुळे हगवण, पोटात इन्फेक्शन आणि टायफॉईड होऊ शकतो. त्यामुळे या दिवसात साफ पाणीच प्या.

फास्ट फूड, तेलकट पदार्थांपासून राहा दूर

पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला चटपटीत आणि तेलकट पदार्थ खावेसे वाटतात. पण यांचे सेवन केल्यामुळे आपल्याला पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. जाणकार सांगतात की पावसाळ्याच्या दिवसात आपली पाचनशक्ती कमजोर असते ज्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते.

पाने असलेल्या किंवा हिरव्या भाज्या टाळा

आपण नेहमी ऐकतो की हिरव्या भाज्या तब्येतीसाठी चांगल्या असतात. पण तज्ञांच्या मते पावसाळ्याच्या दिवसात यांच्यापासून दूर राहावे. या काळात हवेत ओल आणि गरमीमुळे हिरव्या भाज्यांमध्ये अनेक जिवाणू वाढतात. त्यामुळे पावसाळ्यात कोबी, फ्लावर आणि पालक अशा भाज्यांपासून दूरच रहावे.

पेयपदार्थ आणि मसाला चहा पिणे उत्तम

पावसाळ्याच्या दिवसात गरमीमुळे आपल्या शरीरातील द्रवपदार्थ संपून जातात. त्यामुळे शरीरातील द्रवाचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. यासोबतच आपण काढा किंवा विशेष मसाला चहा पिऊ शकता ज्यात आले, वेलदोडा आणि तुळस असे घटक असतात. या मसाल्यांमध्ये जिवाणूविरोधी आणि अँटीइनफ्लेमेटरी गुण असतात. त्यामुळे याशिवाय आपल्या रोजच्या खाण्यातही हळद, काळी मिरची आणि लवंगाचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. यामुळे शरीर संसर्गापासून दूर राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी