Curd For Health । मुंबई : दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनाने शरीराला आणि पोटालाही थंडावा मिळतो. त्याचबरोबर दह्यामध्ये असलेले बॅक्टेरिया देखील त्वचा आणि केसांना निरोगी बनवण्यासाठी प्रभावी असतात. मात्र काही पदार्थ असे आहेत ज्यांच्या सोबत दह्याचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. चला तर म जाणून घेऊया दह्यासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावेत. (Don't accidentally eat curd with these foods).
अधिक वाचा : या सरकारी योजनेत मिळतायेत 30 लाख रुपये, फक्त 10,100 जमा करा
१) केळी आणि दही - तुम्ही अनेकांना केळीसोबत दही खाताना पाहिले असेल. पण असे केल्याने तुमची पचनक्रिया बिघडते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ लागतात. त्यामुळे शरीरात जळजळ होण्यासारखी समस्या उद्भवू शकते.
२) आंबा आणि दही - आंब्याची चव गरम आणि दह्याची चव थंड असते. त्यामुळे केळी आणि दही याप्रमाणे आंबा आणि दही एकत्र खाणे टाळावे. त्यामुळे अॅलर्जी, अपचन, त्वचेवर पुरळ उठणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
३) उडदाची डाळ आणि दही - जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर उडीद डाळीसोबत दही खाऊ नये. त्यामुळे गॅसची समस्या गंभीर होऊन पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे उडीद डाळ दह्यासोबत खाण्यापूर्वी काळजी घ्या.
४) मासे आणि दही - मासे आणि दही एकत्र खाणे धोकादायक मानले जाते. यामुळे शरीराला त्रास सहन करावा लागू शकतो. ज्यामध्ये पचनक्रिया खराब होण्यापासून ते त्वचेच्या संसर्गाचा धोका असू शकतो. त्यामुळे मासे आणि त्यासोबत दही किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये.
५) तळलेले पदार्थ आणि दही - दह्यासोबत कोणतेही तळलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे अपचन, छातीत जळजळ, गॅस आणि पोटात दुखणे तसेच पचन बिघडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दह्यासोबत तळलेले व तेलकट पदार्थ खाणे टाळावे.