Mango and Yogurt: या गोष्टींसोबत चुकूनही खाऊ नका दही; शरीराचे होईल मोठे नुकसान 

Mango and Yogurt । गरमीच्या दिवसात शरीरात गारवा निर्माण होण्यासाठी लोक अनेक गोष्टी खाता-पितात. या दिवसात दह्याचे वापर वाढत असतो. त्यामध्ये मग दह्यापासून बनलेली लस्सी असो की श्रीखंड. यांची मागणी वाढत असते.

Don't accidentally eat yogurt with these things
या गोष्टींसोबत चुकूनही खाऊ नका दही, शरीराचे होईल मोठे नुकसान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गरमीच्या दिवसात दह्याचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढते.
  • दही शरीरात गारवा निर्माण करण्याचे काम करते.
  • दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात.

Mango and Yogurt । मुंबई : गरमीच्या दिवसात शरीरात गारवा निर्माण होण्यासाठी लोक अनेक गोष्टी खाता-पितात. या दिवसात दह्याचा वापर वाढत असतो. त्यामध्ये मग दह्यापासून बनलेली लस्सी असो की श्रीखंड यांची मागणी वाढत असते. उन्हाळ्यात दही खाल्ल्याने त्याचा शरीराला खूप फायदा होतो, पण हे आवश्यक नाही की तुम्ही दही कशासोबत खाल्ले तरच फायदा होईल. अनेकांना दही आणि कांदा मिसळून खायला आवडते. जर ही सवय तुम्हालाही असेल तर तुम्ही जागरूक असले पाहिजे. खर तर ते तुमच्या शरीराला खूप हानी पोहोचवण्याचे काम करते. याशिवाय जर तुम्ही इतर काही गोष्टींसोबत दही खात असाल तर ते तुमच्या शरीराचे नुकसान करू शकते. (Don't accidentally eat yogurt with these things). 

अधिक वाचा : जाणून घ्या वट सावित्रीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती 

आंब्यासोबत तर खात नाही ना दही?

आंबा आणि दूध घालून बनवलेला मँगो शेक उन्हाळ्यात खूप पिला जातो. पण जर तुम्ही दही आणि आंबा एकत्र खाण्याचा विचार करत असाल तर ही चूक अजिबात करू नका. कारण दही आणि आंबा एकत्र खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.

गरम गोष्टींसोबत दही खाऊ नका

दही शरीरात गारवा निर्माण करण्याचे काम करते. त्यामुळे यामध्ये काही गरमागरम पदार्थ घालून खाण्याचा प्रयत्न केला तर ते करणे टाळले पाहिजे. कारण थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाल्ल्याने दातांचे नुकसान होऊ शकते.

या डाळीसोबत खाऊ नये दही 

दही आणि उडीद डाळ एकत्र खाणे हानिकारक आहे. त्यामुळे शरीरात ॲसिडिटी, ब्लोटिंग, लूज मोशन इत्यादी समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला खायचे असेल तर दोन्ही एकत्र खाऊ नका. तसेच हे दोन्ही पदार्थ खाताना काही वेळेच्या फरकानंतर खा. 

मासे आणि दही एकत्र खाऊ नये

दही आणि मासे एकत्र खाऊ नयेत, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात. यांचे एकत्र सेवन केल्याने तुमच्या शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. या पदार्थांचे सेवन एकसाथ केल्यास अपचन, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

दह्याचे अनेक फायदे आहेत

काही गोष्टींमध्ये दही मिसळून खाल्ल्याने होणारी हानी जर तुम्ही बाजूला ठेवली तर दही तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय दात आणि हाडे मजबूत होतात. याशिवाय तुमचे हृदयही निरोगी राहते.


डिस्क्लेमर : तुमचे आरोग्य आमच्यासाठी खूप बहुमूल्य आहे.  वरील दिलेल्या गोष्टी तज्ज्ञानी सांगितलेल्या आहेत,  टाइम्स नाऊ मराठी यात एक्स्पर्ट नाही.   कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी