5kg Dumbbell: पाच किलोच्या डंबेलला कमी लेखू नका, वाचा आश्चर्यकारक फायदे

डंबेल उचलणं हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. या व्यायामामुळे तुम्ही जखमी होण्याची शक्यता कमी होते. डंबेलचा व्यायाम केल्यामुळे हृदयरोगाची शक्यताही कमी व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे रात्रीच्या झोपेचा दर्जाही या व्यायामामुळे सुधारतो.

5kg Dumbbell
पाच किलोच्या डंबेलला कमी लेखू नका  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पाच किलोच्या डंबेलकडे करू नका दुर्लक्ष
  • वजनदार डंबेलपेक्षाही होतात जास्त फायदे
  • दीर्घकाळ मिळू शकतो शरीराला फायदा

5kg Dumbbell: वेट ट्रेनिंगमध्ये (Weight Training) डंबेल एक्सरसाईजचं (Dumbbell Exercise) एक वेगळंच महत्त्व (Importance) आहे. मात्र जिमला जाऊ लागल्यानंतर काही दिवसांतच अनेकजण 5 किलोच्या डंबेलकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. आपले बायसेप (Biceps) मजबूत करण्यासाठी आपल्याला अधिकाधिक वजनदार डंबेल उचलायला हवेत, असं त्यांना वाटू लागतं. मात्र असं करणं ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. कारण 5 किलोच्या डंबेलने व्यायाम करण्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतात. 

काय आहेत फायदे?

डंबेल उचलणं हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. या व्यायामामुळे तुम्ही जखमी होण्याची शक्यता कमी होते. डंबेलचा व्यायाम केल्यामुळे हृदयरोगाची शक्यताही कमी व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे रात्रीच्या झोपेचा दर्जाही या व्यायामामुळे सुधारतो. वजन कमी करण्याचा तुमचा प्रवास डंबेलच्या व्यायामामुळे अधिक जलदरित्या पूर्ण होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा - Woman Health Tips: मासिक पाळीदरम्यान कधीच करू नका या चुका, होईल नाहक त्रास

तंत्राचा करा विचार

व्यायाम करताना क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलल्यामुळे आपली पोजिशन बदलण्याची शक्यता असते. चुकीच्या पोजिशनमध्ये केलेल्या व्यायामाचे अनेक साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. कारण, आपलं पूर्ण लक्ष हे वजन उचलण्याकडे लागलेलं असतं. मात्र पाच किलोच्या डंबेलचा व्यायाम कुठलीही तांत्रिक चूक न होता किंवा शरीरावर कुठलाही अतिरिक्त ताण येऊ न देता तुम्ही करू शकता. योग्य पोजिशन असेल, तर त्याचा आपल्या स्नायूंना सर्वाधिक फायदा होतो. त्यामुळे कमी वजनाच्या डंबेलने केलेल्या व्यायामाचा योग्य फायदा योग्य त्या ठिकाणी पोचतो. 

ॲक्सेसरी लिफ्ट

ॲक्सेसरी लिफ्टला सिंगल जॉइंड मूव्हमेंट असं म्हटलं जातं. यात छोट्या छोट्या स्नायूंच्या गटाचा समावेश असतो. हा व्यायाम करण्यासाठी 5 किलोचा डंबेल उत्तम मानला जातो. या प्रकारच्या व्यायामासाठी तुम्ही वजनदार डंबेल उचलू शकत नाही. या व्यायामप्रकारात लेटरल रेज, रिव्हर्स फ्लाय, लेग एक्सटेन्शन आणि हॅमस्ट्रिंग कर्ल्स यासारख्या छोट्या छोट्या व्यायामांचा समावेश असतो. 

अधिक वाचा - Hands Legs Tingling: तुमच्या हाताला आणि पायाला मुंग्या येतात? मग या जीवनसत्त्वाची आहे कमतरता

एंड्युरन्स पॉवर

जास्तीत जास्त वेळा एखादी कृती करण्याच्या क्षमतेला एँड्युरन्स पॉवर असं म्हटलं जातं. ही शक्ती वाढल्यामुळे कुठलाही व्यायाम तुम्ही जास्त वेळा करू शकता. 5 किलोच्या डंबेलने तुम्ही किमान 15 वेळा हातांची हालचाल करू शकता आणि तीदेखील योग्य प्रकारे 

सांध्यांवर कमी दबाव

अचानक पाच किलोपेक्षा वजनदार डंबेल उचलणं, हे तुमच्या सांध्यांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे सांध्यांवर दबाव येऊन शकतो आणि आयुष्यभर वेदनांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे पाच किलोचा डंबेल व्यायामासाठी सर्वोत्तम मानला जातो.

डिस्क्लेमर - पाच किलोच्या डंबेलमुळे होणाऱ्या फायद्यांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत आणि त्या सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. तुम्हाला याबाबत काही प्रश्न असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी