मधुमेह आजाराला नका कमी लेखू तुम्हाला बनवू शकते आंधळे, रुग्णांना असते अंधत्व येणाची शक्यता

डीआर हा आजार कार्यक्षम प्रौढ व्यक्तींमध्ये (20-65 वर्षे वयोगटातील) उद्भवणाऱ्या अंधत्वामागचे सर्वात आघाडीचे कारण आहे. जगभरात दर 3 पैकी एका व्यक्तीला डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) हा आजार जडतो. नियमित नेत्रतपासणी, विशेषत: मधुमेही आणि वयोवृद्ध व्यक्तींनी नियमितपणे डोळे तपासून घेणे हाच या आजारांचे वेळेवर निदान होण्यासाठीचा आणि आजाराच्या व्यवस्थापनासाठीचा खात्रीचा मार्ग आहे.

Diabetes can cause blindness, know the symptoms
मधुमेह आणू शकतं अंधत्व, जाणून घ्या लक्षणे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतातील 77 टक्के लोक हे या आजाराने ग्रस्त आहेत.
  • मधुमेह रुग्णातील 18 टक्के लोक हे मधुमेही डायबेटीक रेटिनोपॅथी डीआर या आजाराचा सामना करत आहेत.
  • डायबेटीक रेटिनोपॅथीमुळे दृष्टी धूसर होत असते.

नवी दिल्ली : भारतामध्ये (India) 77 दशलक्ष लोक डायबेटिस (Diabetes) अर्थात मधुमेहाने ग्रस्त आहेत. दर 10 माणसांमागे 4 माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. खूप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार दिसत नाही. आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. मधुमेह या आजाराने ग्रस्त असले्ल्या लोकांपैकी 18 टक्के लोक हे मधुमेही डायबेटीक रेटिनोपॅथी डीआर या आजाराचा सामना करत आहेत.  हा आकडा अत्यंत चिंताजनक असूनही भारतामध्ये डायबेटिक  रेटिनोपॅथी (डीआर) सारख्या मधुमेहाच्या परिणामी उद्भवणाऱ्या गंभीर आणि अपरिवर्तनीय आजारांविषयी फारशी जागरुकता दिसून येत नाही.  (Don't Underestimate Diabetes Can Make You Blind Patients are prone to blindness)

अधिक वाचा  : एकादशी आणि रविवारी तुळशीला का अर्पण नाही करत जल?

आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत सामावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. हव्या त्या प्रमाणात  त्या व्यक्तीच्या इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार किंवा मूत्राशयाचे विकार उद्‍भवू शकतात.   त्यापैकी एका आजार म्हणजे डायबेटिक  रेटिनोपॅथी म्हणजेच डीआर.

अधिक वाचा  : अरे देवा! आता Amazonमधील 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

डीआर हा आजार कार्यक्षम प्रौढ व्यक्तींमध्ये (20-65 वर्षे वयोगटातील) उद्भवणाऱ्या अंधत्वामागचे सर्वात आघाडीचे कारण आहे. जगभरात दर 3 पैकी एका व्यक्तीला डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) हा आजार जडतो. नियमित नेत्रतपासणी, विशेषत: मधुमेही आणि वयोवृद्ध व्यक्तींनी नियमितपणे डोळे तपासून घेणे हाच या आजारांचे वेळेवर निदान होण्यासाठीचा आणि आजाराच्या व्यवस्थापनासाठीचा खात्रीचा मार्ग आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीचे निदान झाल्यावर मधुमेह प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याची परिणती नेत्रविकारात होणे टाळण्यासाठी औषधोपचारांचे काटेकोर पालन करणे आणि निरोगी जीवनशैली जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  

मधुमेहींची संख्या वाढत असताना प्रत्येक 3 मधुमेहींपैकी एका व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) आजार जडतो, असा अंदाज आहे आणि आजही ते तरुण, कार्यक्षम वयातील प्रौढ व्यक्तींमधील अंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे.मुंबई रेटिना सेंटरचे सीईओ व्हिट्रिओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी या आजारवर दिलासादायक गोष्ट सांगितली आहे.  ते म्हणातात की,“आजच्या काळातील युवा मधुमेही या आजाराविषयी व त्यावरील उपचारांविषयी अधिक जागरुक आहेत, मात्र त्यांच्या विद्यमान जीवनशैलीमुळे त्यांना आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवता येत नाही. आज, आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतींमुळे डायबेटिक रेटिनोपॅथी आजार बळावण्याचा वेग मंदावता येतो, प्रसंगी रोखताही येतो, ज्यामुळे मधुमेहींमधील अंधत्व टाळता येते.”  

मधुमेहाचा डोळ्यांवर परिणाम होत आहे हे कसे ओळखाल

अनियंत्रित मधुमेहामुळे डीआर, मोतीबिंदू म्हणजे डोळ्याच्या लेन्सवर एक दुधी पापुद्रा तयार होणे आणि डोळ्यांच्या नसांचे नुकसान करणाऱ्या ग्लुकोमासारखे अनेक नेत्रविकार उद्भवू शकतात. मधुमेहामुळे तुम्हाला असे आजार होण्याची शक्यता खूपच वाढते किंवा तरुण वयातच हे आजार तुम्हाला गाठू शकतात. त्यामुळे आपण अत्यंत सतर्क राहिले पाहिजे. पुढीलपैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास ऑप्थॅल्मोलॉजिस्ट किंवा रेटिना विशेषज्ज्ञांची भेट घेतली पाहिजे:
•    दृष्टी धूसर होणे किंवा अस्पष्ट दिसणे किंवा प्रतिमा वेड्यावाकड्या दिसणे
•    रंग नीट ओळखता न येणे 
•    रंगांमधील वा आकारातील भेद ओळखण्याची क्षमता कमी होणे 
•    दृष्टीमध्ये काळे ठिपके दिसणे 
•    सरळ रेषा लहरींसारख्या किंवा वाकड्यातिकड्या दिसणे 
•    दूरचे पाहण्यास त्रास होणे 
•    हळूहळू नजर कमी होत जाणे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी