Dragon Fruit Price In India: कमलम म्हणजे काय ते जाणून घ्या, त्याचे फायदे, तोटे आणि किंमत जाणून घ्या

Dragon Fruit Price In India: जरी ड्रॅगन फळ हे भारताचे फळ नसले तरी त्याची उत्कृष्ट चव व फायदे यामुळे भारतातील या फळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

dragon fruit price in india know what is kamalam in marahti read here its benefits side effects
कमलम म्हणजे काय ते जाणून घ्या 

थोडं पण कामाचं

  • भारतात अनेक प्रकारची फळे खाली जातात. बरीच फळे फक्त भारतातच  पिकवली जातात तर काही फळे इतर देशांतूनही आयात केली जातात.
  • ड्रॅगन फ्रूटबद्दल सांगणार आहोत. त्याला पिताया या नावानेही ओळखले जाते.
  • नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून कमलम करण्याचा निर्णय घेतला आहे

Dragon Fruit Price In India:  भारतात अनेक प्रकारची फळे खाली जातात. बरीच फळे फक्त भारतातच  पिकवली जातात तर काही फळे इतर देशांतूनही आयात केली जातात.  आज आम्ही तुम्हाला ड्रॅगन फ्रूटबद्दल सांगणार आहोत. त्याला पिताया या नावानेही ओळखले जाते. नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलून कमलम करण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रॅगन फ्रूट हे भारताचे फळ नसले तरी उत्कृष्ट स्वाद आणि फायदे यामुळे भारतातील या फळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 


ड्रॅगन फळ आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि त्यामध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जर आपण दररोज त्याचे सेवन केले तर ते आपल्याला अॅक्टीव्ह ठेवेल. ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट असतात जे आपल्या चयापचयसाठी (मेटाबॉलिझम) चांगले असते. 


भारतात ड्रॅगन फ्रूटची किंमत

हे गुलाबी रंगाचे विदेशी फळ पाहण्यासाठी खूपच सुंदर आहे आणि ते चवीलाही गोड आहे. त्याची बाजारभाव प्रति किलो 500 ते 600 रुपये आहे.

ड्रॅगन फ्रूटचे फायदे

  1. रोगप्रतिकार शक्ती बूस्ट -ड्रॅगन फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते, ज्यामुळे शरीराला बर्‍याच संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण देण्यात मदत होते. ड्रॅगन फळातील उच्च पाण्याचे प्रमाण आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते. यात लोह आणि फायबर असते जे आपल्याला निरोगी ठेवते.
  2. कोलेस्टेरॉलसाठी चांगले - ड्रॅगन फळ कोलेस्ट्रॉलसाठी चांगले असते, आहारात हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याच्या बियामध्ये ओमेग -3, ओमेगा -6 फॅटी अॅसिडस् आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
  3. रक्तातील साखरेसाठी चांगले - ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मधुमेह(डायबिटीज)  नियंत्रित करण्यास मदत होते, कारण मधुमेह रूग्णांमध्ये साखरेची पातळी स्थिर होते आणि  शुगर स्पाइक्स  रोखण्यास मदत होते.
  4. कर्करोगाचा प्रतिबंध- ड्रॅगन फळातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून कर्करोगाच्या पेशींचे उत्पादन रोखू शकतात. या फळात उपस्थित क्रोटीन्समध्ये एंटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, ज्यामुळे ट्यूमरचा त्रास कमी होण्यास मदत होते.

ड्रॅगन फ्रूटचे तोटे

  1. साखरेचे प्रमाण ड्रॅगन फळामध्ये आढळते. ज्यामुळे त्याचा जास्त प्रमाणात वापर करू नये.
  2. ड्रॅगन फळ खाताना या फळाची बाह्य आवरण चुकूनही खाले नाही पाहिजे. यामध्ये कीटकनाशके आहेत जी आपल्याला हानी पोहोचवू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी