Weight Loss Drink: वजन कमी करण्यासाठी प्या ही ३ मसालेदार पेय, लोण्यासारखी वितळेल चरबी

Benefits of Spices For Weight Loss । आजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये वजन कमी करणे सोपे काम नाही, कारण बहुतांश लोकांना तर जिममध्ये जाण्यासाठी वेळही मिळत नाही.

Drink 3 spicy drinks to lose weight, fat will be reduced immediately
वजन कमी करण्यासाठी प्या ही ३ मसालेदार पेय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये वजन कमी करणे सोपे काम नाही.
  • जिरे, बडीशेप आणि कोथिंबीर यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करणारे पेय तयार करू शकता.
  • कोथिंबीरीला अँटीसेप्टिक गुणधर्माने समृद्ध मानले जाते.

Benefits of Spices For Weight Loss । मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमध्ये वजन कमी करणे सोपे काम नाही, बहुतांश लोकांना जिममध्ये जाण्यासाठी वेळही मिळत नाही. जर तुम्ही देखील वर्कआउट न करता पोटातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर काही सोपे उपाय करून यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. वजन कमी करण्यासाठी ३ प्रकारच्या मसाल्यांचे पेय तयार करा, असे केल्याने पोटाचा त्रासही दूर होईल आणि पोटाचे आरोग्य देखील सुधारेल. (Drink 3 spicy drinks to lose weight, fat will be reduced immediately). 

अधिक वाचा : शरद पवारांच्या 'त्या' फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

वजन कमी करण्यासाठी ही ३ मसालेदार पेय प्या 

जिरे, बडीशेप आणि कोथिंबीर यांच्या मदतीने तुम्ही वजन कमी करणारे पेय तयार करू शकता, यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा तिन्ही मसाले घेऊन रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हलक्या प्रमाणात उकळा आणि नंतर गाळून प्या. या पेयामध्ये लिंबू आणि काळे मीठ घातल्यास त्याचा परिणाम चांगला होतो.

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत?

बडीशेपचे फायदे 

बडीशेप (Fennel) खाल्ल्याने मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स चांगल्या प्रकारे शोषली जातात, ज्यामुळे झपाट्याने वजन कमी होते. या मसाल्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. लक्षणीय बाब म्हणजे एक चमचा बडीशेपमध्ये २० कॅलरीज, १ ग्रॅम प्रथिने, ३ ग्रॅम कार्ब, २ ग्रॅम फायबर असते. यामुळे चयापचयाची क्रिया सुधारते, जे वजन कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.

कोथिंबीरीचे फायदे 

कोथिंबीरीला अँटीसेप्टिक गुणधर्माने समृद्ध मानले जाते, ते शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यास मदत करते आणि चेहऱ्यावर एक अद्भुत चमक देखील आणते. कोथिंबीर रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉल देखील नियंत्रित करते. कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. या मसाल्यामध्ये पचनक्रिया सुधारण्याची ताकद असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

जिऱ्याचे फायदे 

जिरे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, त्यात कॅल्शियम, कॉपर, आयरन, मॅंगनीज, जिंक, पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई देखील भरपूर प्रमाणात असतो. जिरे खाल्ल्याने चयापचय चांगले होते आणि त्यामुळेच पोटाची चरबी झपाट्याने कमी होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी