Health Tips: कोल्ड्रिंक ऐवजी बेलफळाचे सरबत प्या, शरीर निरोगी राहील, अनेक आजारही दूर होतील

तब्येत पाणी
Updated Apr 17, 2022 | 16:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Health Benefits Of Bel Sharbat: बेलफळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याचे रोज सेवन केल्यास अनेक प्रकारचे गंभीर आजार शरीरापासून दूर ठेवण्यास प्रभावी ठरते.

Drink belfal syrup, it will keep the body healthy
बेलफळाचे सरबत शरीराला निरोगी ठेवते  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पोटाशी संबंधित तक्रारी बेलफळाच्या सरबतामुळे दूर होतात
  • व्हिटामिन बी 1, बी 2, पोटॅशियम इतर सर्व घटक बेलफळात आढळतात.
  • शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते.

Health Benefits Of Bel Sharbat: उन्हाळ्याच्या हंगामात, लोकं कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करतात. अशा परिस्थितीत, कोल्ड ड्रिंक्सऐवजी, बेलफळाचे सरबत हा एक उत्तम पर्याय आहे. बेलफळाचे सरबत हे केवळ स्वादिष्टच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे देखील देते. याचे सेवबन केल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, तर ते शरीराला दीर्घकाळ थंड ठेवण्याचे काम करते.


बेलफळाच्या सरबताचे फायदे जाणून घ्या. 

1 जर तुमच्या पोटात समस्या असेल तर बेल शरबत खाणे खूप फायदेशीर आहे. पोटाशी संबंधित अनेक समस्या याच्या सेवनाने दूर होतात.  बेलफळाच्या सेवनाने अपचनाची समस्या दूर होते. पोटाशी संबंधित अनेक समस्या याच्या सेवनाने दूर होतात.जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होत असेल, बद्धकोष्ठता असेल तर बेलफळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.


2 बेलफळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याचे रोज सेवन केल्यास अनेक प्रकारचे गंभीर आजार शरीरापासून दूर ठेवण्यास प्रभावी ठरते. दुसरीकडे, बेलफळ केवळ एकच नाही तर अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे. व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, नियासिन, कॅरोटीन, पोटॅशियम आणि इतर सर्व पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात आढळतात.


3. जर तुम्ही दररोज बेलफळाच्या सरबताचे सेवन केले तर ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. रोजच्या सरबताच्या सेवनाने विषारी पदार्थ शरीरातून सहज बाहेर पडतात. दुसरीकडे, मूत्रपिंडात स्टोनची समस्या असल्यास, बेलाच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर आहे.

Weight Loss: 4 reasons why Bael ka Sharbat is the healthiest drink to lose  weight this summer - Times of India
4. जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर बेलफळाचे सरबत खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, तर याच्या सेवनाने पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज एक ग्लास बेलफळाचे सरबत अवश्य प्या. 

५. बेलफळाचे सरबत रोज प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी हळूहळू कमी होते. बेलफळाच्या सरबतामध्ये ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित करण्याची क्षमता असते. म्हणून, बेलफळाचे सरबत भरपूर प्रमाणात सेवन करणे उत्तम. 

6. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर बेलफळाचे सरबत खूप फायदेशीर आहे. यामध्ये रेचक नावाचे तत्व आढळते, जे पोटाशी संबंधित अनेक गंभीर समस्या दूर ठेवण्यास खूप उपयुक्त आहे.मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज एक ग्लास बेलफळाचे सरबत प्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी