Coriander Water Health Benefits | मुंबई : प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाकगृहामध्ये कोथिंबीर जरूर असते. कोथिंबीरचा वापर चव वाढवण्यासाठी आणि मसूरापासून भाज्या, चटणी यामध्ये केला जातो. कोथिंबिरीचा सुगंध जेवणाची चव वाढवतो, तर कोथिंबीरीचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोंथिबीर ही एक औषधी वनस्पती देखील असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. (Drink Coriander water every morning for weight loss).
अधिक वाचा : लक्ष्मी घरी येण्याआधी देते हे संकेत, वाचा सविस्तर
कोथिंबीरीचे पाणी पोटाच्या सर्व समस्यांसाठी रामबाण उपाय आहे. सकाळी रिकाम्या पोटी शरीरासाठी अनेक फायदे असलेले कोथिंबीरीचे पाणी पिणे त्वचेची आणि केसांची चमक वाढवते. याशिवाय वजन नियंत्रित करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. कोथिंबीरीच्या पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते. चला तर म जाणून घेऊया कोथिंबीरीचे पाणी कसे तयार करायचे.
* २५ ते ३० कोथिंबीरीची पाने
* १ लिंबू
* १ ग्लास पाणी
* सर्वप्रथम कोथिंबीरीच्या पानांना स्वच्छ धुवा.
* आता काडीने पाने हळूच आणि अलगद काढा.
* काही पाने चिरून बाजूला ठेवा.
* आता एक मिक्सरचे भांडे घ्या.
* त्यात १ ग्लास पाणी, कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्या.
* बर्फ घालून थंड करून प्या.