Orange Juice: सकाळी-सकाळी प्या संत्र्याचा ज्यूस; होतील कमालीचे फायदे; आजच करा आहारात समावेश

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Sep 03, 2022 | 16:28 IST

Orange Juice Benefits For Health: कॅलरीज, व्हिटॅमिन सी, कार्ब्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषक तत्वे एका ग्लास संत्र्याच्या ज्यूसमध्ये आढळून येतात. अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या संत्र्याच्या ज्यूसमध्ये असलेल्या इतर फायद्यांची माहिती जाणून घ्या.

Orange Juice
सकाळी का प्यावा संत्र्याचा ज्यूस 
थोडं पण कामाचं
  • दररोज एक ग्लास तरी ताज्या फळांचा ज्यूस प्यायल्यानं आरोग्य तंदुरूस्त राहते.
  • एक ग्लास संत्र्याचा ज्यूस आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.
  • रोज सकाळी हे प्यायल्यास ते आरोग्यासाठीही चांगले असते.

मुंबई: Amazing Health Benefits: चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी फळांचा ज्यूस (Orange Juice Benefits)खूप फायदेशीर ठरतो. दररोज एक ग्लास तरी ताज्या फळांचा ज्यूस प्यायल्यानं आरोग्य तंदुरूस्त राहते. त्यातच एक ग्लास संत्र्याचा ज्यूस आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. रोज सकाळी हे प्यायल्यास ते आरोग्यासाठीही चांगले असते. कॅलरीज, (calories, vitamin C,) व्हिटॅमिन सी, कार्ब्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषक तत्वे एका ग्लास संत्र्याच्या ज्यूसमध्ये आढळून येतात. अनेक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या संत्र्याच्या ज्यूसचे इतर फायदे जाणून घ्या. (drink daily morning orange juice benefits health tips in marathi)

रोगप्रतिकारक शक्ती करते मजबूत 

संत्र्याचा ज्यूस आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यासाठी मजबूत बनवतो. संत्र हे फळ केवळ शरीराच्या ऊतींच्या निर्मितीमध्येच मदत करत नाही, तर शरीराला शक्तीही देते. यामुळेच हे खाल्ल्यास किंवा याचा ज्यूस प्यायल्यास अनेक आजारांशी लढण्याची ताकद मिळते.

अधिक वाचा- असा बनवा आल्याचा कडक चहा, सोपी पद्धत 

हृदयाचे अनेक आजारही दूर राहतात

संत्र्यामध्ये आढळणारे B9 आणि फोलेटचे गुणधर्म शरीरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही रोज 2 कप संत्र्याचा ज्यूस प्यायला तर ब्लड प्रेशरही नियंत्रित राहण्यास मदत होते. संत्र्याचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजनयुक्त ब्लड फ्लो सुरळीत राहतो, त्यामुळे अनेक प्रकारचे हृदयविकार दूर राहतात.

रिंकल्स दूर करते

व्हिटॅमिन सी त्वचेसाठी चांगले मानले जाते. संत्र्याच्या सेवनाने बॉडी डिटॉक्स होते, ज्यामुळे शरीर शुद्ध होते. आता जर तुम्हाला रिंकल्स दूर करायच्या असतील तर संत्र्याच्या ज्यूसमध्ये लिंबाचा रस मिसळून प्या. याचा फायदा तुम्हाला मिळेल.

डोळ्यांसाठी चांगले

संत्र्यामध्ये कॅरोटीन आणि व्हिटॅमिन दोन्ही असतात, जे डोळ्यांसाठी चांगले मानले जातात. व्हिटॅमिन कॉर्नियाचे संरक्षण करते. दुसरीकडे, संत्र्याचा ज्यूस डोळ्यांना बॅक्टिरिया किंवा संसर्गापासून वाचवण्यास मदत करतो.

कोलेस्ट्रॉलसाठी ही होते मदत

जर तुम्ही संत्र्याचा ज्यूस खूप दिवसांपासून सेवन करत असाल तर ते तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते. संत्र्यामध्ये भरपूर फायबर आढळते, ज्याच्या मदतीने ते कोलेस्ट्रॉल राखण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी