Weight loss ayurvedic drink : सध्या वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात. त्यात जॉगिंगला जाणे, जिममध्ये व्यायाम करणे आणि डाएट यांचा समावेश आहे. असे असले तरी त्यातून नेहमीच फरक पडतो असे नाही. आयुर्वेदातही काही पेय आणि आहार सांगितले आहे त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. आयुर्वेदात एक पेय म्हणजेच ड्रिकं सांगितले आहे त्यामुळे पोटातील चरबी कमी होते. इतकेच नाही तर त्यामुळे ऍसिडीटीचा त्रासही कमी होतो. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जिरे, सौंफ आणि धने पाण्यात घालून प्यायल्यास पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते.
सर्वात आधी एक चमचा जिरे, एक चमचा सौंफ आणि एक चमचा धने एका ग्लासात पाण्यात रात्रभर भिजून ठेवा. त्यानंतर सकाळी उठून हे पाणी गरम करावे आणि गाळून हे पाणी प्यावे. हे पाणी अधिक फायदेशीर आणि चवदार बनवण्यासाठी त्यात सैंधव मीठ आणि लिंबाचा रस घालावा.
जीरे हे चांगले अँटीऑक्सिडेंट म्हणून ओळखले जाते. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, फायबर, मॅगनीज, जिंक मॅगनीज आणि आयर्न सारखी पोषक तत्वे असतात. तसेच जिर्यात विटॅमिन ई, ए, सी, आणि बी कॉम्प्लेक्सचाही समावेश असतो. ही सर्व तत्त्व आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. यामुळे शरीराची पचनसंस्था मजबूत होते.
आरोग्यदायी धने
नियमित धन्याचे सेवन केल्यास चेहर्यावर तेज वाढते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही. धने खाल्याने पचनशक्ती चांगली होते. तसेच धन्यात विटॅमिन ए असल्याने ते डोळ्यांसाठी फायदेशीर असतात.
सौंफमधील विटॅमिनमुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी प्रथिनं महत्त्वाची ठरतात. सौंफमध्ये ही प्रथिनं मोठ्या प्रमाणात असतात. एक चमचा सौंफमध्ये २० कॅलरी, एक ग्रॅम प्रोटीन, ३ ग्राम कार्ब्स आणि २ ग्रॅम फायबर असतं. सौंफ खाल्ल्यामुळे पचनशक्ती चांगली होते आणि त्यामुळे वजन ताब्यात राहतं.