लिंबू पाण्यात टाका चिमूटभर काळे मीठ, आठवड्याभरात कमी होईल Belly fat

तब्येत पाणी
Updated Oct 22, 2020 | 16:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Belly fat: लिंबू पाणी आणि काळे मीठ हे कॉम्बिनेशन शरीरातील विषारी घटक पदार्थ बाहेर फेकण्यास मदत करते.यासोबत मेटाबॉलिज्म वाढतो ज्यामुळे वजन वेगाने घटते. 

lemon water
लिंबू पाण्यात चिमूटभर काळे मीठ, आठवड्याभरात कमी होईल वजन  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • वजन घटवण्यासाठी साधारणपणे डाएट आणि नियमित व्यायाम गरजेचा असतो.
  • सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास वजन वेगाने घटते
  • लिंबू पाणी आणि काळे मीठ असे कॉम्बिनेशन आहे जे मेटाबॉलिज्म वाढवते आणि वेगाने वजन घटवण्यास मदत करते. 

मुंबई: व्यस्त जीवनशैली(busy lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे(wrong diet) लठ्ठपणाची(obesity) समस्या वेगाने वाढत आहे. वजन वाढण्यामुळे(weight gain) अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामुळे लोक वजन घटवण्यासाठी विविध पद्धती वापरतात. मात्र त्यानंतरही अनेकांमध्ये काहीच फरक दिसत नाही. 

वजन घटवण्यासाठी साधारणपणे डाएट आणि नियमित व्यायाम गरजेचा असतो. बरेच लोक जिममध्ये मोठ्या प्रमाणात घाम गाळतात आणि शरीराची चरबी घटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र डाएट आणि एक्सरसाईजशिवाय काही फूड कॉम्बिनेशन असे आहेत जे वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात. लिंबू पाणी आणि काळे मीठ असे कॉम्बिनेशन आहे जे मेटाबॉलिज्म वाढवते आणि वेगाने वजन घटवण्यास मदत करते. 

लिंबू पाणी आणि काळ्या मीठाचे फायदे

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास वजन वेगाने घटते. लिंबामध्ये व्हिटामिन सी, अँटी ऑक्सिडंट्स, व्हिटामिन आणि मिनरल असते. यामुळे शरीर हायड्रेट होण्यास मदत होते तसेच मेटाबॉलिज्म वाढते. लिंबू पाणी आणि काळ्या मीठाचे आरोग्यास अनेक फायदे होतात. काळ्या मीठामध्ये प्राकृतिक खनिज असते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. नियमितपणे लिंबू पाणी आणि काळे मीठ प्यायलाये शरीराची चरबी कमी होण्यास मदत करते. 

लिंबू पाणी आणि काळे मीठ हे कॉम्बिनेशन पचनाशी संबंधित आजार दूर करते. हे पेय प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. तसेच अपचनाचाही त्रास होत नाही. जर तुमचे पाचनतंत्र योग्य तऱ्हेने काम करत नसेल तर तुम्हाला एक्स्ट्रा बॉडी फॅट कमी होण्यास मदत होणार नाही. 

शरीरास होणारे अनेक फायदे

  1. लिंबू पाण्यासोबत काळ्या मीठाचे सेवन केल्यास पाचनतंत्राचा पीएच लेव्हल बनण्यास मदत होते. यामुळे अॅसिडिटी, त्वचा रोग, ऑस्टियोपोरोसिस आणि आर्थराईटिसची समस्या होत नाही. 
  2. काळे मीठ जेवणातील अधिक प्रमाणातील पोषकतत्वे शोषून घेण्याचे काम करते. 
  3. काळ्या मीठात अँटी ऑक्सिडंट असतात जे हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि पेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे रोखते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी