Weight loss: लिंबू पाण्यात गूळ टाकून प्यायल्याने लवकर होणार वजन कमी

तब्येत पाणी
Updated Oct 08, 2020 | 16:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss tip: लठ्ठपणा कमी करण्यासाठी जर तुम्ही डाएटिंग करत आहात आणि त्याचा कोणताही रिझल्ट येत नाही आहे. तर तुम्ही लिंबू पाण्यात हूळ टाकून त्याचे सेवन करू शकता. 

weight loss
लिंबू पाण्यात गूळ टाकून प्यायल्याने लवकर होणार वजन कमी 

थोडं पण कामाचं

  • साखरेच्या तुलनेत गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
  • लिंबाचा रसाने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते
  • वजन घटवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

मुंबई:  फिट(fit) आणि हेल्दी(healthy) राहण्यासाठी तुम्हाला एक्सरसाईज(exercise) करण्यासोबतच चांगला डाएट(proper diet) घेणेही गरजेचे आहे. जर तुम्ही तीन वेळेस चांगले जेवण करून समाधानी आहात तर लठ्ठपणा(obesity) कमी करण्यासाठी इतकेच पुरेसे नाही. जर वजन घटवण्यासाठी(weight loss) तुमची स्नॅक्स खाण्याची सवय, भोजन करण्याच्या वेळेसोबत शरीराला हायड्रेट करण्यावरही लक्ष दिले पाहिजे. 

आहारात बदल केल्याने केवळ मेटाबॉलिज्म सुधरत नाही तर पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे वजनही कंट्रोल होते. तसेच बॉडी स्लिम दिसते. वजन घटवण्यासाठी गूळ आणि लिंबू पाणी अशी एक आयुर्वेदिक पद्धत आहे. दररोज याचे सेवन केल्याने बॉडी फॅट कमी होते आणि लठ्ठपणा कमी होतो. 

गुळाचे फायदे

साखरेच्या तुलनेत गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स, झिंक आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. इतकंच नव्हे तर गूळ शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. जेवणानंतर एक छोटा तुकडा गूळ खाल्ल्यास जेवण पचायला मदत होते. याशिवाय गूळ श्वसन आणि पाचनतंत्राच्या सफाईसाठीही चांगले असते. 

लिंबाचे फायदे

लिंबामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते.लिंबाचा रसाने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि मेटाबॉलिज्मही वाढते. एका रिसर्चनुसार लिंबात आढळणारे पॉलिफिनोल अँटीऑक्सिडंट वजनला नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पॉलिफिनॉल एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करून एचडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढवतो. 

असे करा लिंबूपाणी आणि गुळाचे सेवन

एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस आणि एक छोटा तुकडा गुळाचा टाका. पाण्यात गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतर याचे सेवन करा. वजन घटवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. 

वजन कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी एक ग्लास गूळ आणि लिंबू पाण्याचे सेवन केले पाहिजे. हे फायदेशीर असते. यात तुम्ही स्वाद वाढवण्यासाठी पुदिन्याची पानेही टाकू शकता. दरम्यान, गुळाचे प्रमाण कमी ठेवा ज्यामुळे पाणी खूप गोड होणार नाही.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी