How To Remove Kidney Stones: नवी दिल्ली : अलीकडच्या काळात सर्वत्र आढळणारा एक त्रासदायक आजार किंवा आरोग्याची समस्या म्हणजे मूतखडा. किडनीशी संबंधित ही समस्या खूप वेदनादायक असते. किडनी स्टोन किंवा मूतखड्याच्या (Kidney Stone)समस्येत रुग्णाला खूप वेदना होतात. मुतखडा होतो तेव्हा रुग्णाला खूप वेदनादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. किडनी स्टोनच्या समस्येत रुग्णाला त्याचा आहार अतिशय काळजीपूर्वक घ्यावा लागतो. जर तुम्हाला मूतखड्याची समस्या असेल तर काही रसांच्या (Juices to remove Kidney stone) मदतीने या समस्येवर मात करू शकता. हे ज्यूस कोणते आहेत आणि ते कसे बनवायचे हे जाणून घ्या. (Drink these 3 juices to remove kidney stone read in Marathi)
अधिक वाचा : त अक्षरावरुन मुला-मुलींची लेटेस्ट नावे, जाणून घ्या अर्थासह
जर मूतखड्याचा त्रास होत असेल तर तुम्ही हे 3 प्रकारचे ज्यूस तुमच्या आहारात समाविष्ट करा. यामुळे वेदना कमी होत या समस्येतून आराम मिळेल.
1. टोमॅटोचा रस
मूतखड्याचे दुखणे दूर करण्यासाठी टोमॅटोचा रस खूप फायदेशीर असतो. यासाठी दोन टोमॅटो धुवून त्यांना किसून घ्या. त्यानंतर त्या रसात मीठ आणि काळी मिरी पावडर टाका. हे मिश्रण चांगले तयार झाल्यानंतर याचे रसाच्या रुपात तुम्ही सेवन करा.
2. लिंबाचा रस
लिंबू हा अत्यंत गुणकारी असतो. एरवीदेखील त्याचा आहारात समावेश करणे खूप फायद्याचे असते. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते. मूतखड्याच्या समस्येमध्ये लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने या वेदनेतून मुक्ती मिळू शकते. यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका. त्यात चवीनुसार मीठ टाका. नंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून त्याचे सेवन केल्याने मूतखड्याच्या दुखण्यातून मुक्ती मिळू शकते.
3. तुळशीचा रस
तुळशीला तर आयुर्वेदात देखील खूप महत्त्व देण्यात आले आहे. तुळशीचे औषधी गुणधर्म खूप मोठे असतात. मूतखड्याच्या समस्येतदेखील तुळस खूप उपयोगी ठरते. तुळशीपासून बनवलेला रस किडनी स्टोन फायदेशीर असतात. यासाठी तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात एक चमचा मध टाकावे. त्यानंतर या मिश्रणाचे सकाळी आणि संध्याकाळी सेवन केल्याने मूतखड्याच्या वेदनेतून मुक्ती मिळते.
अधिक वाचा : Mumbai Water Cut:अरे देवा! मुंबईत उद्या-परवा 24 तासांसाठी पाणीकपात, तुमच्या भागात काय असेल स्थिती?
मूतखड्याच्या समस्येमागे मुख्य कारण हे आहारातील असमोतल हे असते. अलीकडच्या बदललेल्या जीवनशैलीत, फास्ट फूड, चमचमीत, बाहेरचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मूतखड्याच्या समस्येत योग्य आहार आणि घरगुती उपायांच्या मदतीने या दुखण्यातून मुक्ती मिळवता येते.
(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)