Weight loss drink: रात्री झोपण्याआधी करा या ४ वस्तूंचे सेवन, वजन होईल कमी

तब्येत पाणी
Updated Nov 11, 2021 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Weight loss drink: या बातमीत आम्ही तुम्हाला अशा ४ ड्रिंक्सबद्दल माहिती देत आहोत ज्या वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहेत. 

weight loss
Weight loss drink: रात्री झोपण्याआधी करा या ४ वस्तूंचे सेवन 
थोडं पण कामाचं
  • वजन कमी कऱण्यासाठी तुम्ही कॅलरीज भरपूर असलेल्या मिठाया तसेच तळलेल्या पदार्थांपासून दूर राहू शकता.
  • अशातच असे काही हेल्दी ड्रिंक्स आहेत जे रात्री झोपण्याआधी सेवन केल्यास वजन घटवण्यास मदत मिळते. 
  • वजन घटवण्यासाठी हळद घातलेले दूध तुमची मदत करू शकते.

मुंबई: जर तुम्ही लठ्ठपणाने(obesity) त्रस्त आहात आणि वजन कमी करण्याचा(weight loss) विचार करत आहात तर नक्कीच तुमच्या कामाची ही बातमी आहे. आपण पाहतो की वजन घटवण्यासाठी लोक काय काय नाही करत. कोणी जिमला(gym) जातं तर कोणी खाणंपिणं बंद करतं. यामुळे शरीरात अशक्तपणा येऊ शकतो. हेल्थ एक्सपर्ट्स(health experts) सांगतात की रात्रीच्या जेवणात काहीतरी गडबड झाल्यास तुमचे वजन कमी करण्यात बाधा निर्माण होऊ शकते. वजन कमी कऱण्यासाठी तुम्ही कॅलरीज भरपूर असलेल्या मिठाया तसेच तळलेल्या पदार्थांपासून दूर राहू शकता. मात्र अनेकदा आपला स्वत:वरचा ताबा सुटतो. अशातच असे काही हेल्दी ड्रिंक्स(healthy drinks) आहेत जे रात्री झोपण्याआधी सेवन केल्यास वजन घटवण्यास मदत मिळते. drink this 4 juice before go to sleep

वजन घटवण्यासाठी बेस्ट ड्रिंक्स

हळद घातलेले दूध

वजन घटवण्यासाठी हळद घातलेले दूध तुमची मदत करू शकते. यामुळे सर्दी, खोकला तसेच इतर आजारही बरे होतात. कारण हळद ही अँटी ऑक्सिडंट असते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यात कॅल्शियम आणि प्रोटीनही असते जे चांगली झोप आणि वजन घटवण्यास फायदेशीर ठरते. 

दालचिनीचा चहा

दालचिनीमध्ये अँटी ऑक्सिडंटआणि अँटीबायोटिक गुण असतात जे याला संपूर्ण डिटॉक्स ड्रिंक बनवतात. यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. जर तुम्हाला याचा स्वाद आवडत नसेल तर तुम्ही यात एक चमचा मध मिसळू शकता. 

बीट आणि लिंबाचा रस

बीट आणि लिंबापासून बनलेले हे ड्रिंक हेल्थसाठी चांगले असते. हे आपल्यासाठी बॉडी डिटॉक्स ड्रिंक्सप्रमाणे काम करते. झोपण्याआधी या ड्रिंकचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. 

मेथीदाण्याचे पाणी

भिजवलेले मेथीचे दाणे ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी चांगले आहेत. साधारणपणे याचे सेवन सकाळच्या वेळेस केले जाते मात्र रात्रीही याचे सेवन केले जाऊ शकते. मेथीचे दाणे शरीरात गरमी निर्माण करतात आणि यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी