Juice for weight loss:वजन कमी करण्यासाठी दररोज प्या हा ज्यूस, काही दिवसांत दिसेल फरक

तब्येत पाणी
Updated Jun 23, 2022 | 18:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tomato Juice Benefits: टोमॅटो हा आरोग्यासाठी फायदेशीर असते. अशातच तुम्ही जर लठ्ठपणाने त्रस्त असाल तर तुम्ही दररोज टोमॅटोचा ज्यूस पिऊ शकता. 

tomato juice
weight loss: वजन कमी करण्यासाठी दररोज प्या हा ज्यूस 
थोडं पण कामाचं
  • टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते.ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते.
  • टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासोबतच ते कंट्रोलही करू शकता
  • टोमॅटोचा ज्यूस हृदयासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.

मुंबई: टोमॅटो(tomato) आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतो. ते खाणे शरीरासाठी अतिशय हेल्दी(healthy) मानले जाते सोबतच यात अनेक पोषकतत्वे असतात. टोमॅटो अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये टाकून खाल्ला जातो. टोमॅटोमध्ये कॅल्शियम, व्हिटामिन आणि फॉस्फरस आढळते. याशिवाय हे औषधाच्या रूपातही काम करतेतसेच यात खासकरून लायकोपीन आढळते जे एक पॉवरफुल अँटी ऑक्सिडंट मानले जाते. तर टोमॅटोचा ज्यूस तुम्हाला वजन कमी करण्यातही फायदेशीर ठरतो. अशातच आम्ही आज तुम्हाला टोमॅटो ज्यूस पिण्याचे फायदे सांगणार आहोत. Drink this juice for weight loss

अधिक वाचा - बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती

इम्युनिटी वाढवण्यासाठी 

टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते.ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. यासोबतच बीटा कॅरोटी, लायकोपीन, व्हिटामिन ई इत्यादीही इम्युनिटी बूस्ट करण्याचे काम करतात टोमॅटोचे सेवन केल्याने तुम्ही फ्री रॅडिकल्सपासूनही बचाव करू शकता. 

वजन करा कंट्रोल

टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासोबतच ते कंट्रोलही करू शकता.टोमॅटोच्या ज्यूसमध्ये फायबर आढळते जे वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते. तसेच टोमॅटोचा ज्यूस आपल्या पोटासाठीही अतिशय फायदेशीर आहे. 

हेल्दी स्किनसाठी

चांगली आणि निरोगी त्वचा हवी असेल तर टोमॅटोचे सेवन लाभदायक ठरते. दररोजा टोमॅटोचा रस प्यायल्याने तुमची स्किन हेल्दी राहते तसेच चेहऱ्यावर पुटकुळ्या, पिंपल्स, ड्राय स्किनसारख्या समस्येपासून सुटका होते. तसेच त्वचेवर ग्लोही येतो. 

अधिक वाचा - Belly Fat कमी करण्यासाठी करा हे सोपे 5 वर्कआऊट

निरोगी हृदयासाठी 

टोमॅटोचा ज्यूस हृदयासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. यातून मिळणारे बीटा कॅरोटिन आणि लायकोपीनसारखी तत्वे ही पॉवरफुल अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, फॅट यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी