Health Tips: लठ्ठपणाने झालाय त्रस्त? झोपण्यापूर्वी या चहा पिऊन लठ्ठपणापासून मिळवा सुटका 

तब्येत पाणी
Updated May 22, 2022 | 10:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tips For Weight Loss | तुम्ही झोपताना देखील शरीरातील चरबी कमी करू शकता. दरम्यान आज आपण अशाच काही ५ चहांबद्दल भाष्य करणार आहोत, ज्या चहा झोपण्यापूर्वी घेतल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

Drink this tea before going to bed to lose weight fast
झोपण्यापूर्वी या चहा पिऊन लठ्ठपणापासून मिळवा सुटका   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुम्ही झोपताना देखील शरीरातील चरबी कमी करू शकता.
  • वजन कमी करण्यासाठी आपण छोट्या-छोट्या पावलांनी सुरुवात केली पाहिजे.
  • अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध पुदिन्याचा चहा वजन कमी करण्यासाठी तसेच इतर अनेक समस्यांवर प्रभावी आहे.

Tips For Weight Loss | मुंबई : तुम्ही झोपताना देखील शरीरातील चरबी कमी करू शकता. दरम्यान आज आपण अशाच काही ५ चहांबद्दल भाष्य करणार आहोत, ज्या चहा झोपण्यापूर्वी घेतल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. यातील पहिली चहा म्हणजे लिंबू चहा, याशिवाय असे अनेक चहा आहेत, जे तुमचे वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करतात. पण तुम्हाला ते पिण्याची योग्य वेळ देखील माहित असणे आवश्यक आहे. (Drink this tea before going to bed to lose weight fast). 

अधिक वाचा : डी-गँग सक्रीय, परदेशात बसून दाऊद अशाप्रकारे चालवतो टोळी

वजन कमी करण्याची प्रक्रिया

आरोग्य तज्ज्ञ लक्ष्मी म्हणतात की, "वजन कमी करण्यासाठी आपण छोट्या-छोट्या पावलांनी सुरुवात केली पाहिजे. सर्वप्रथम आपण आपली जीवनशैली सुधारली पाहिजे. त्यासाठी चांगली झोप आणि तणावाची पातळी कमी करावी लागेल, ज्यामुळे शरीरातील चयापचय गती सुधारेल. यामुळे आपले अतिरिक्त वजनही कमी होते.

यासाठी एक कप प्री-बेड चहा घेणे हा उत्तम उपाय आहे. झोपण्यापूर्वी एक कप हर्बल चहा केवळ तुमचे मन शांत करू शकत नाही, तर गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण करू शकते. मग तुमचे शरीर चांगली झोप घेण्यास तयार होते. 

अधिक वाचा : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

१) दालचिनी चहा (Cinnamon Tea) 

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर झोपण्यापूर्वी दालचिनीचा चहा घेणे सुरू करा. हे उर्जेचे पॉवरहाऊस आहे. ते तुमची भूक भागवण्यासाठी ओळखले जाते. दालचिनी हा असाच एक मसाला आहे, जो चयापचय देखील वाढवतो. वजन कमी करण्यात मदत करण्याव्यतिरिक्त, दालचिनी एक नैसर्गिक दाहक-विरोधी एजंट म्हणून कार्य करते. हे तुम्हाला डी-ब्लोटिंग आणि तणाव कमी करण्यास देखील मदत करू शकते.

२) कॅमोमाइल चहा (Chamomile tea)

कॅमोमाइल चहा शरीरातील जळजळ कमी करणे आणि चांगली झोप घेण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, "कॅमोमाइल चहा पोटात दुखणे, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, अपचन आणि गॅस यांसारख्या पाचक समस्या दूर करण्यात देखील मदत करते. त्यात एपिजेनिन आणि बिसाबोलोल सारखे उपचार करणारे घटक आहेत, जे प्राचीन काळापासून घरगुती उपचारांसाठी वापरले जात आहेत. कॅमोमाइल चहा प्यायल्यानंतर तुम्हाला झोप येऊ लागेल. रात्री झोपेचा हा एक उत्तम मार्ग आहे. कॅमोमाइलची फुले गरम पाण्यात घाला आणि ५ मिनिटे सोडा. मग पाणी गाळून गरम चहासारखे प्या. 

३) पुदीन्याची चहा (Peppermint Tea) 

अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध पुदिन्याचा चहा वजन कमी करण्यासाठी तसेच इतर अनेक समस्यांवर प्रभावी आहे. त्याच्या ताज्या चहामध्ये कॅलरीज कमी तर असतातच, पण भूक कमी करण्याची ताकदही असते. त्यामुळे पचनशक्ती वाढते. पुदिना शरीराचे तापमान वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे आपला चयापचय दर योग्य होतो. हे तणाव, डोकेदुखी यांपासून आराम देते आणि आपल्याला चांगली झोप घेण्यास देखील मदत करते. हे कॅलरीज बर्न करण्यास मदत करते, म्हणून त्याचे सेवन केल्याने वजन कमी करणे सोपे आहे.

४) ग्रीन टी (Green Tea)

वजन कमी करण्यासाठी हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते, जे चयापचय वाढवते. हे चरबी जाळण्याचे प्रमाण वाढवून वजन कमी करण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करते.

५) लॅव्हेंडर चहा (Lavender Tea)

लॅव्हेंडर केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. लॅव्हेंडर चहाचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे ते वजन कमी करण्यास देखील मदत करते. "झोपण्यापूर्वी लॅव्हेंडर चहाचा एक घोट खूप प्रभावी आहे. हे तुम्हाला आराम देते आणि तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करते." असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. रात्रभर चांगली झोप घेतल्याने वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. याशिवाय ते तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी