drink warm water mixed with jaggery in the morning belly fat will melt and bones will become strong know benefits : दररोज सकाळी झोप पूर्ण करून उठल्यावर दात न घासता (ब्रश न करता) आधी 1 किंवा 2 ग्लास गुळ मिसळलेले कोमट पाणी प्या. आरोग्याला फायदा होईल. गुळामुळे दिवसभराच्या कामांसाठी शरीराला ऊर्जा मिळेल. तसेच गुळाच्या माध्यमातून शरीराला आयर्न (लोह), फोलेट, पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, सोडियम, कॉपर पण मिळेल. शरीराचे पोषण होईल.
गुळ मिसळलेले कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त मेद कमी होण्यास सुरुवात होईल. चरबी वितळण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल. वेटलॉस सुरू झाल्यामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
कोमट पाण्यात मिसळण्यासाठी किसलेला गुळ किंवा गुळ पावडर यांचा उपयोग करू शकता. गुळ मिसळलेले कोमट पाणी आरोग्यासाठी लाभदायी आहे. जाणून घ्या गुळ मिसळलेले कोमट पाणी पिण्याचे पाच प्रमुख फायदे....
डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.
झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?
मजबूत हाडांसाठी खा हे 7 पदार्थ