सकाळी उठून गरम पाणी पित आहात? वजन कमी करण्याच्या नादात करून घेऊ नका स्वतःचे नुकसान! 

तब्येत पाणी
Updated Apr 12, 2023 | 11:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hot Water Drinking Side Effect : वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी गरम पाणी पित असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक असू शकते. कसे ते जाणून घ्या. 

रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे टाळायला हवे.
रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे नुकसान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वेट लॉस च्या चक्कर मध्ये गरम पाणी पित आहात तर सावधान! करून घेऊ नका स्वतःचे नुकसान 
  • गरम पाणी तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.
  • बद्धकोष्टता आणि पित्ताची समस्या

What will happen if drink hot water everyday : काही लोकांना सकाळी उठून गरम पाणी पिण्याची सवय असते. वजन कमी करण्यासाठी आणि पोट साफ राहण्यासाठी ते गरम पाणी पितात. तर काही लोकं हाय कोलेस्ट्रॉलच्या कारणामुळे सुद्धा रिकाम्या पोटी गरम पाण्याचे सेवन करत असतात. पण, हे जर अधिक काळ करत राहिले तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. (Drinking Hot Water Side Effect what will happen if drink hot water everyday )

खास करून उन्हाळ्यामध्ये तसेच गरमीच्या दिवसांमध्ये दररोज रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.  त्यामुळे ही सवय वेळीच थांबवा.     : 

अधिक वाचा : राशी भविष्य 12 एप्रिल : आजचा बुधवार तुमच्यासाठी कसा? वाचा

रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊ ते कसे. 

1.  बॉडी पीएच मध्ये बिघाड होऊ शकतो

रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने बॉडी पीएच बिघडू शकते. शरीरातील एसीडीक आणि बेसिक नेचर असंतुलित झाल्यामुळे बॉडी पीएच बिघडते. असे झाल्याने पित्ताची समस्या निर्माण होते. तसेच अपचन आणि ब्लॉटिंग ची समस्या देखील होते. 

2. मल:निसरण कार्यात अडथळा 

रिकाम्या पोटी गरम पाण्याचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते, हे जरी खरे असले तरी ते सातत्याने करू नये.  दररोज गरम पाणी पित राहिल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. गरम पाण्यामुळे मल कठोर बनतो, आणि टिशूजला नुकसान पोहोचवू शकतो, ज्यामुळे मल:निसरण मार्गावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अशावेळी, रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे टाळा. कारण, अनेक काळ असे करत राहिल्याने पित्त आणि बद्धकोष्टता होण्याचा संभव अधिक असतो. 

अधिक वाचा : ​रोहितच्या MI ने शेवटच्या चेंडूवर मिळवला 'थ्रिलर' विजय

3. शरीर डिहायड्रेटेड होऊ शकते

रिकाम्या पोटी गरम पाण्याचे सेवन करणे डिहायड्रेशनला आमंत्रण देण्यासारखे आहे. होय, हे खरे आहे, गरम पाण्याला शरीर सामान्य पाण्याच्या रूपात स्वीकारत नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे खूप काही समस्या देखील उद्भवू शकतात. 

तर या सर्व कारणांमुळे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे टाळायला हवे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी