Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दिवसभर गरम पाणी चांगलं की वाईट?, मग तज्ज्ञ काय म्हणतात एकदा जाणून घ्या

तब्येत पाणी
Pooja Vichare
Updated Aug 31, 2022 | 09:02 IST

Hot Water For Weight Loss: कोरोना महामारीनंतर लोकांनी त्यांच्या फिटनेस आणि आरोग्याकडे (fitness and health) खूप गांभीर्यानं पाहण्यास सुरूवात केली आहे. लोकं सध्या या गोष्टीकडे अधिक लक्ष देतात.

Weight Loss Tips
गरम पाणी पिण्याचे फायदे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात काहींना आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. तर काही जण वेळात वेळ काढून तब्येतीची काळजी घेत असतात.
  • कोरोना महामारीनंतर लोकांनी त्यांच्या फिटनेस आणि आरोग्याकडे (fitness and health) खूप गांभीर्यानं पाहण्यास सुरूवात केली आहे.
  • स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आजकाल बरेच लोक वजन कमी करण्यात किंवा ते कंट्रोल करण्यात गुंतले आहेत.

मुंबई: Hot water good for weight loss: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात काहींना आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. तर काही जण वेळात वेळ काढून तब्येतीची काळजी घेत असतात. असंच काही वजन कमी करण्यासाठी लोकांचं होतं. पण आरोग्य आणि फिटनेसकडे आवर्जुन लक्ष दिले पाहिजे. कोरोना महामारीनंतर लोकांनी त्यांच्या फिटनेस आणि आरोग्याकडे (fitness and health)  खूप गांभीर्यानं पाहण्यास सुरूवात केली आहे. लोकं सध्या या गोष्टीकडे अधिक लक्ष देतात. लोक त्यांचा आहार, व्यायाम, योगासने आणि जीवनशैलीची पूर्ण काळजी घेतात, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत राहते. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आजकाल बरेच लोक वजन कमी करण्यात किंवा ते कंट्रोल करण्यात गुंतले आहेत. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी.  (is hot water good for weight loss)लोकांचा असा विश्वास आहे की, नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी जलद बर्न होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. पण खरोखरच गरम पाणी प्याल्यानं वजन कमी (weight loss) होते का?, यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया. रायबरेलीच्या जिल्हा रुग्णालयातील डॉ.शंकर आचार्य यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

गरम पाण्यामुळे वजन कमी होते का? (Does hot water cause weight loss?)

या प्रश्नावर तज्ज्ञ सांगतात की, गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय वाढतो. पचनक्रिया सुधारण्यासाठीही गरम पाणी उत्तम मानले जाते.

अधिक वाचा-  'या' अभिनेत्याच्या मेहुणीसोबत पार्टी करताना दिसला शाहरूखचा लाडका Aryan Khan

गरम पाणी पिण्याचे फायदे (Benefits of drinking hot water)

गरम पाणी मेटाबॉलिज्म बूस्ट करते 

गरम पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म वेगाने वाढतो. तसेच शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जेवणाच्या अर्धा तास आधी गरम पाणी प्यायल्यास ते मेटाबॉलिज्म 30 टक्क्यांनी वाढवू शकते, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

भूकेवर येतं नियंत्रण

गरम पाण्याचे नियमित सेवन केल्याने भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवणापूर्वी थोडेसे गरम पाणी प्यायल्याने कॅलरीज जलद बर्न होतात. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते.

पचनक्रिया सुधारते

अनेकांना अन्न खाल्ल्यानंतर पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्या होतात. अशा लोकांना नियमित गरम पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाण्यामुळे आतडे आकुंचन पावण्यास मदत होते. तसेच गरम पाण्याचे सेवन केल्याने आतड्यांमधील रक्तसंचय कमी होतो. गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे घाम येतो. घामामुळे पोर्समधील टॉक्सिन्स बाहेर पडतात.

वजन कमी करण्यासाठी कसे सेवन कराल गरम पाणी

वजन कमी करण्यासाठी दिवसातून तीन वेळा कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर, दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 तास आधी गरम पाण्याचे सेवन केले तर ते जलद वजन कमी करण्यास मदत करू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी