Dehydration Symptoms:मानवाच्या शरीरात 60 टक्के पाण्याचे प्रमाण आहे. यावरुन पाण्याचं महत्त्व किती आहे ते कळतं. डॉक्टर आणि वैद्य तज्ज्ञ आपल्याला 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात घात येत नसल्याने शरीरातील पाणी बाहेर पडत नाही. त्यामुळे लोक जास्त पाणी पित नाहीत. तर उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने लोकं जास्त पाणी पित असतात. तर युरिनमधूनही शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते.
अधिक वाचा : Virat Kohli : IPL मध्ये 'किंग' कोहलीचा 'विराट' विक्रम
डॉक्टरांच्या मतानुसार, लोकांनी उन्हाळ्यात जास्त पाणी प्यायले पाहिजे. जर कमी पाणी प्यायले तर शरीरात अनेक समस्या निर्माण होत असतात. या कोणत्या समस्या होत असतात या काय समस्या असतात, याची माहिती आपण घेणार आहोत..
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास तीव्र डोकेदुखी होऊ शकते. हे मायग्रेन देखील होऊ शकते. जास्त काळ निर्जलीकरण डिहायड्रेट राहू नये.
अधिक वाचा : जास्त लसूण खाल्ल्याने शरीरात निर्माण होतात अनेक समस्या
उन्हाळ्यात अनेकांची लघवी गडद होते. शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे हे लक्षण आहे. मूत्र गडद पिवळ्या रंगाचे असल्याचे दिसून येते. या काळात जास्त पाणी प्यावे.
जर तुम्ही कमी पाणी पीत असाल तर त्यामुळे थकवा येऊ शकतो. शरीर निर्जलीकरण झाल्यावर थकवा जाणवणे. या दरम्यान पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढवावे.
अधिक वाचा : अमिताभ जया बच्चनशी नसतात रोमँटिक
उन्हळ्यात लोकं तोंड कोरडं पडत असल्याचं म्हणत असतात. लाळ तोंडातून बॅक्टेरिया काढून टाकण्याचे काम करते. तोंड कोरडे पडल्यास तोंडात वाईट बॅक्टेरिया वाढू शकतात. तोंड कोरडे पडल्यास तोंडात वाईट बॅक्टेरिया वाढू शकतात. नुकसान होऊ शकते.
अधिक वाचा : मेट्रोत जोडप्याच्या प्रेमाला आला ऊत
कमी पाणी प्याल्याने शरीरावर परिणाम होत असते. रॅशेस देखील होतात. त्वचेच्या संरक्षणासाठी लोक महागडे मॉइश्चरायझर लावतात. यामुळे जास्त पाणी प्यायले पाहिजे.
कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा मोठा परिणाम पोटावर दिसून येतो. पाणी प्यायल्यास पचनक्रिया बिघडते. पाणी कमी प्यायल्याने पोटातील आतड्या कोरड्या होत असतात. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बचावासाठी पाण्याचे प्रमाण वाढवा.
Disclaimer: या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.