Water Intake: जास्त पाणी पिणे किडनीसाठी ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या किती पाणी प्यावे?

तब्येत पाणी
Updated Mar 27, 2023 | 20:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

गरजेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट करू नये असे म्हंटले जाते, कारण कोणत्याही गोष्टींचा अतिरेक उलटा परिणाम करणारी असते. पाणी प्यायच्या पद्धतीला देखील ही गोष्ट लागू होते. जास्त पाणी पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रोज किती पाणी पिणे फायदेशीर याबद्दल जाणून घेऊयात. 

योग्य प्रमाणात पाणी प्यावे
प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • प्रमाणा पेक्षा जास्त पाणी पिणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
  • ओव्हरहायड्रेशन होण्याचा धोका
  • जाणून घ्या किती पाणी प्यावे?

Health Tips  पाणी आपल्या शरीरासाठी अमृत मानले जाते, आपल्या शरीराचा सुमारे 60 टक्के भाग पाण्याने भरलेला असतो. पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील सर्व कचरा आणि विषारी पदार्थ सहज बाहेर काढले जातात.  Drinking too much water can be dangerous for the kidneys!

यासोबतच शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. पण, जास्त पाणी प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, ज्याला ओव्हरहायड्रेशन असे म्हंटले जाते. 

अधिक वाचा : ​अनेक वर्षांपूर्वीचे स्मृती इराणींनी सांगितले सत्य, म्हणाल्या- "गर्भपातानंतर शिकला मानवतेचा धडा"

गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यामुळे होणाऱ्या समस्या 

जेव्हा तुम्ही जास्त पाणी पितात तेव्हा वॉटर पॉयजनिंग, इन्टॉक्सिकेशन आणि मेंदूशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अतिरिक्त पाण्याचे सेवन केल्यामुळे मेंदू आणि शरीरातील पेशींना सूज येण्याची शक्यता जास्त आहे. 

जेव्हा मेंदूच्या पेशी फुगतात तेव्हा त्या मेंदूवर दबाव टाकतात, ज्यामुळे कंफ्यूजन, निद्रानाश आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवतात. जेव्हा मेंदूवर दबाव वाढतो तेव्हा उच्च रक्तदाब आणि ब्रॅडीकार्डिया (हृदयाची गती मंदावते) सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. 

जास्त पाण्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील सोडियमवर खूप वाईट परिणाम होतो. सोडियम हे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट आहे जे पेशींच्या आत आणि बाहेरील द्रवपदार्थ संतुलित करते. मात्र, जास्त पाणी प्यायल्यामुळे आपल्या आपल्या शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ लागते. ज्यामुळे शरीरातील द्रव्य घटक पेशींच्या आत जातात, आणि त्यामुळे पेशींना सूज येते आणि व्यक्ति कोमामध्ये जाऊ शकते तसेच मृत्यू देखील होऊ शकतो. 

अधिक वाचा : ​Major disaster averted : मोठा विमान अपघात टळला, एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाईन्सच्या विमानाची टक्कर टळली

पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?

पाणी शरीरासाठी खूप आवश्यक आहे, पण एका व्यक्तीने एका दिवसात किती पाणी प्यावे याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली नाहीत. तुमच्या शरीराला पाण्याची किती गरज आहे हे,तुमच्या शारीरिक हालचालीवर आणि शारीरिक वजनावर अवलंबून असते.

तसेच, आजूबाजूच्या वातावरणाची देखील त्यात मोठा वाटा आहे. मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील युरोलॉजी आणि युरो ऑन्कोलॉजीचे असोसिएट डायरेक्टर डॉ. यजवेंद्र प्रताप सिंह राणा यांच्या मते, 'सामान्य दिवसांत 3 लिटर आणि उन्हाळ्यात 3.5 लिटरपर्यंत पाणी पिणे योग्य मानले जाते.' 

अधिक वाचा : ​Apply For Passport : घरबसल्या पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अप्लाय, जाणून घ्या सोपी पद्धत

प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याचा किडनीवर कसा परिणाम होतो?

अतिरिक्त पाणी प्यायल्यामुळे ओव्हरहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते आणि ओव्हरहायड्रेशनचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, असे म्हंटले जाते.

किडनी स्टोन सारख्या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी पाणी जास्त पिण्याचा सल्ला दिला जातो, पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिता तेव्हा तुमच्या किडनीला टाकाऊ पदार्थांपासून मुक्त होण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे हार्मोनल रिएक्शन होते, आणि तणाव तसेच थकवा जाणवू लागतो. 

भरपूर पाणी प्यायल्यानंतरही जर तुम्हाला लघवी व्यवस्थित होत नसेल, तर तुमची किडनी क्षमतेपेक्षा जास्त काम करत असल्याचे हे संकेत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी